नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *ग्रंथदान हा उपक्रम शिक्षकांच्या ‘चांगुलपणाची चळवळ’ झाली तरच वाचन संस्कृती वाढेल : जीवन साळोखे* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*ग्रंथदान हा उपक्रम शिक्षकांच्या ‘चांगुलपणाची चळवळ’ झाली तरच वाचन संस्कृती वाढेल : जीवन साळोखे*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*ग्रंथदान हा उपक्रम शिक्षकांच्या ‘चांगुलपणाची चळवळ’ झाली तरच वाचन संस्कृती वाढेल : जीवन साळोखे*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गडहिंग्लज
ग्रंथदान हा उपक्रम शिक्षकांची चळवळ झाली तरच, वाचन संस्कृती वाढेल, समृद्ध शालेय ग्रंथालयाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल आणि शाळाशाळांतील विद्यार्थी अधिक वाचते होतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी केले.
सौ.वि.दि. शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज येथे आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत तालुक्यातील १२ माध्यमिक शाळांना पुस्तक संच वाटप समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक डी.व्ही.चव्हाण होते.
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सभापती प्रा.डॉ.सौ. जयश्री संतोष तेली, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र खोराटे, गडहिंग्लज हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी रमेश कोरवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाचन प्रोत्साहन आणि शालेय ग्रंथालय समृद्धी यासाठी ग्रंथदान उपक्रमांतर्गत जीवन साळोखे यांनी दिलेल्या सुमारे दोनशेहून अधिक दर्जेदार पुस्तकांचे वाटप गडहिंग्लज तालुक्यातील तालुक्यातील वि.दि. शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज,गडहिंग्लज हायस्कूल, गडहिंग्लज, परिश्रम हायस्कूल,दुंडगे, हनिमनाळ हायस्कूल,पार्वती हायस्कूल, औरनाळ, एस.डी.हायस्कूल, मुतनाळ, एस.एम.हायस्कूल,बसर्गे, शिवराय हायस्कूल,नंदनवाड, जरळी हायस्कूल,जरळी, न्यू इंग्लिश, मुगळी, रामलिंग हायस्कूल, नूल या १२ माध्यमिक शाळांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते यावेळी उत्साहात करण्यात आले.
प्रारंभी या ग्रंथदान समारंभाचे आयोजक वि.दि.शिंदे हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.व्ही.चव्हाण यांनी उपस्थितांना पुस्तके भेट देवून सर्वांचे स्वागत केले.
आपल्या भाषणात माजी सभापती डॉ. जयश्री तेली यांनी ग्रंथदान उपक्रम अखंड सुरू ठेवणाऱ्या जीवन साळोखे यांचा गौरव करून, वाचन संस्कृती, ग्रंथप्रसार,वाचक संस्था यांचे महत्त्व सविस्तर विशद केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी हालबागोळ यांनी अशाप्रकारे ग्रंथदान उपक्रम गडहिंग्लज तालुक्यात प्रथमच होत असल्याचे सांगून, यावर्षात ग्रंथदान अभियान संपूर्ण तालुक्यात राबवण्याचे जाहीर करून सर्वांना सहकार्याचे आवाहन केले. यावेळी राजेंद्र खोराटे, पी.टी.पाटील, डी.व्ही.चव्हाण आदींनी मनोगते व्यक्त केली.
आपल्या ओघवत्या भाषणात जीवन साळोखे म्हणाले, फक्त वाचनामुळेच माणसाचे आयुष्य रद्दी होत नाही. योग्य वाचनातून संस्कार निर्माण होतात.त्यामुळे आयुष्य सुसह्य होते.विचरी पिढी घडण्यास वाचनाला पर्याय नाहीच. यावेळी प्राचार्य जीवन साळोखे यांचेकडून सर्व शाळांना पुस्तक संचासोबत, वाचन संस्कृती प्रोत्साहनपर सन्मान चिन्ह, ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर.रंगनाथन यांची प्रतिमा देण्यात आली.
गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघाकडून तालुक्यात समृद्ध शालेय ग्रंथालय अभियान राबविण्याचा मनोदय पदाधिकाऱ्यांकडूनही यावेळी जाहीर करण्यात आला. सूत्रसंचालन व समारोप अर्जुन हराडे यांनी केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930