नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत अश्विनी तावडे प्रथम* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत अश्विनी तावडे प्रथम*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत अश्विनी तावडे प्रथम*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, महाराष्ट्र- गोव्याच्या वतीने पंचायत समिती, भुदरगड येथे पोषण माह आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ विशेष प्रसिध्द अभियानात आयोजित तालुकास्तरीय भरडधान्य पाककृती स्पर्धेत खानापूर (ता. भुदरगड) येथील अश्विनी प्रविण तावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सौ. तावडे यांनी या स्पर्धेत ‘न्याहारी थाळी’ ही विशेष पाककृती सादर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सही पोषण- देश रोशन कार्यक्रमांतर्गत २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तृणधान्यापासून बनविल्या जाणाऱ्या विविध पदार्थांचे मानवी आहारात अनन्य साधारण महत्त्व आहे. या विविध पदार्थांचा मानवी आरोग्यासाठी खूप मोठा फायदा आहे याचे महत्त्व समजण्यासाठी व जाणीव जागृती करणेसाठी या स्पर्धांचे आयोजन केले होते. सौ. तावडे यांनी या स्पर्धेत गहू, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरी, ज्वारी, राळा या तृणधान्यापासून मोदक, माडगं, भाकरी, खीर, पिठलं, राजिगरा वडी, खिचडी, थालीपीठ, अळूवडी ही विशेष थाळी बनवली होती. ही थाळी उपस्थित अधिकारी व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या स्पर्धेसाठी अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, खानापूर या शाळेचे विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी शीतल पाटील, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, प्राचार्या मंजुषा माळी, सौ.अर्चना पांगिरेकर, बजरंग वरपे, पुनम वरपे प्रविण तावडे आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930