नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक : शिक्षक आमदार जयंत आसगावकर* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक : शिक्षक आमदार जयंत आसगावकर*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक : शिक्षक आमदार जयंत आसगावकर*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी काढले.
श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय, व्हन्नूर (ता.कागल) येथे कागल तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने आयोजित सेवानिवृत्त व नूतन मुख्याध्यापकांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी एस.एम.पाटील होते.
आमदार प्रा. जयंत आसगावकर पुढे म्हणाले, मुख्याध्यापकांनी विविध घटकांना सोबत घेऊन नेहमी कार्यतत्पर रहावे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबवून आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा.
यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष बी.आर.बुगडे, एस.टी.चौगुले, सौ.सुवर्णा माने यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विविध स्पर्धातील गुणवंतांचा सत्कार, सेवानिवृत्त व नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार, तसेच शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील व स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव यशवंतराव निकम, पी. व्ही. पाटील, शाकेरा मुजावर, जी. के.भोसले, भारमल, राजश्री चौगुले, अशोक वारके, पी.डी.माने, प्रभावती पाटील, एस.बी. पाटील व तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ए.आर.खामकर यांनी, सूत्रसंचालन राजश्री इंगवले यांनी केले. तर आभार सचिव अशोक बुगडे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031