नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *विद्यामंदिर मडिलगे बुद्रुक येथे डॉ.अब्दुल कलाम यांना दिली अनोखी आदरांजली* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*विद्यामंदिर मडिलगे बुद्रुक येथे डॉ.अब्दुल कलाम यांना दिली अनोखी आदरांजली*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*विद्यामंदिर मडिलगे बुद्रुक येथे डॉ.अब्दुल कलाम यांना दिली अनोखी आदरांजली*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
विद्यामंदिर मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथे दै.पुढारी तर्फे वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला. डॉ.अब्दुल कलाम यांना अनोखी पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृत्तपत्राचे वाटप करून स्वावलंबी शिक्षणाचा संदेश थेट कृतीतून दिला आहे.
शाळेतील विद्यार्थी कु.श्रीश नितीन कांबळे याने डॉ.अब्दुल कलाम यांची व्यक्तिरेखा साकारली होती. कु.श्रीश कांबळे व त्याचे सहकारी मित्र योगीराज, शौर्य, यश, स्वरांजली, आर्या, रोहित, रुद्रा, आयुष, संस्कार यांनी गावात फिरून दैनिक पुढारी वृत्तपत्राचे वाटप करून स्वावलंबी शिक्षणाचा संदेश थेट कृतीतून दिला आहे .
गावातील पेपर विक्रेता श्री.संभाजी मांडे यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला . हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेतील सर्व मुलांना अवांतर वाचनाची पुस्तके वाचण्यास देण्यात आली. मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हा एक प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला .
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मालंडकर तसेच शाळेतील अध्यापक श्री. खापरे , श्री. भारती , श्रीमती चौगले व श्री. नितीन कांबळे सर यांचे सहकार्य लाभले …

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930