नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आपल्या बुद्धी, क्षमता आणि सामर्थ्याचा योग्य वापर करून समाजाची प्रगती साधावी : श्रीपाद कुलकर्णी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आपल्या बुद्धी, क्षमता आणि सामर्थ्याचा योग्य वापर करून समाजाची प्रगती साधावी : श्रीपाद कुलकर्णी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आपल्या बुद्धी, क्षमता आणि सामर्थ्याचा योग्य वापर करून समाजाची प्रगती साधावी : श्रीपाद कुलकर्णी
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, आजरा
समाजातील सर्वांनीच आपल्या बुद्धी, क्षमता आणि सामर्थ्याचा वापर करून आपली आणि समाजाची प्रगती साधावी, असे आवाहन श्रीपाद कुलकर्णी यांनी केले. ब्राह्मण विकास मंडळ, आजरा यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा उत्सव २०२३ आयोजित करण्यात आला होता.
शालेय विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक अशांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंडळातर्फे रांगोळी व पाककला स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. संघटनेचे महत्त्व ओळखून आपल्या ज्ञाती बांधवांसाठी एकत्र येऊन सर्वांनी काम करूया असे आवाहनही अनेक मान्यवरानी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.आजरा अर्बन बँकेचे चेअरमन डॉ.अनिल देशपांडे, जयवंत हरळीकर, श्री. जनवाडकर, डॉ. दीपक सातोस्कर, डॉ.अंजली देशपांडे अशा मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण हे करण्यात आले. वकील शैलेश देशपांडे, मनोहर गव्हाणकर आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. चैतन्य सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक आपले वय विसरून विविध खेळात सहभागी झाले व आनंद लुटला.
संयोजन सोमनाथ भातखंडे व सहकाऱ्यांनी केले. रांगोळी स्पर्धांचे परीक्षण डॉ.दीपक सातोस्कर, मिलिंद आपटे व मायदेव वहिनी यांनी तर पाक कृती स्पर्धेचे परीक्षण डॉ. अंजली देशपांडे, सौ.गाडगीळ, श्री.प्रधान यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मायदेव, मंदार बापट, आशिष देशपांडे,अशा सर्व ज्ञाती बांधवांनी सहकार्य केले. उपस्थित सर्वांना मंडळाच्या वतीने अल्पोपहार व कोजागिरी निमित्त दूध वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वामन सामंत मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930