नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पन्हाळा तालुक्यातील १३ माध्यमिक शाळा व हमालांच्या वाचनालयास ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे ३ नोव्हेंबर रोजी ३०० पुस्तकांची भेट देणार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पन्हाळा तालुक्यातील १३ माध्यमिक शाळा व हमालांच्या वाचनालयास ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे ३ नोव्हेंबर रोजी ३०० पुस्तकांची भेट देणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पन्हाळा तालुक्यातील १३ माध्यमिक शाळा व हमालांच्या वाचनालयास ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे ३ नोव्हेंबर रोजी ३०० पुस्तकांची भेट देणार
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोतोली
पन्हाळा तालुक्यातील १३ माध्यमिक शाळांना आणि दळवेवाडी येथील हमालांच्या वाचनालयास ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार जीवन साळोखे हे ३०० पुस्तके भेट देणार आहेत. कोतोली (ता.पन्हाळा) येथील नेहरू विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे शुक्रवार दि.३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रशालेच्या सभागृहात हा ग्रंथदान कार्यक्रम होत आहे. या प्रशालेचे प्राचार्य प्रफुल्ल पोर्लेकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात सुरु असणाऱ्या आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील विविध शाळा व वाचनालयांना वाचन प्रोत्साहन व समृद्ध शालेय ग्रंथालयासाठी प्राचार्य जीवन साळोखे हे ग्रंथदान करणार आहेत.
पन्हाळा तालुक्यातील श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल, क॥बोरगाव, साधना हायस्कूल, पुनाळ, माध्यमिक विद्यालय, घोटवडे, जय ज्योतिर्लिंग हायस्कूल, कोलोली, स्वामी स्वरूपानंद हायस्कूल, तिरपण, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल आणि योगी प्रभुनाथ हायस्कूल वाघवे, बाबासाहेब पाटील हायस्कूल आणि नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोतोली, ज्ञानराज हायस्कूल, सावर्डे (कळे ), संजयसिंह माध्यमिक विद्यालय, दळवेवाडी, श्रीमंत संजयसिंह गायकवाड हायस्कूल, पिंपळे आणि कळे विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज कळे तसेच हमालांचे वाचनालय, दळवेवाडी या सर्वांना प्रत्येकी २० दर्जेदार, वाचनीय पुस्तकांचा संच, ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन यांचा फोटो, वाचन प्रोत्साहनासाठी सन्मान चिन्ह ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे हे समारंभपूर्वक देणार आहेत.
आपल्या वाचन प्रोत्साहनासाठी आणि समृद्ध शालेय ग्रंथालयासठी ग्रंथदान या उपक्रमांतर्गत ही पुस्तके ते जाहीर कार्यक्रमात भेट देणार आहेत. पन्हाळा तालुक्यात अशा प्रकारे, जाहीररित्या ग्रंथदान कार्यक्रम प्रथमच होत आहे.
प्राचार्य जीवन साळोखे हे गेली अठरा वर्षे शाळाशाळांतून ग्रंथदान हा उपक्रम एकहाती राबवत आहेत. याकाळात त्यांनी सुमारे १३ हजार पुस्तके दान केली आहेत. नामवंत साहित्यिकांच्या वाचनीय आणि शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांचा समावेश यामध्ये असून जिल्ह्य़ातील प्रत्येक शालेय ग्रंथालय हे त्या शिक्षण संस्थेचे वैभव ठरावे, त्यासाठी ग्रंथदान उपक्रम हा चळवळ होण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांसह शिक्षक-पालक वर्गात वाचनाची आवड वाढण्यासाठी, ते समाजातील सर्व घटकांना वेळोवेळी ग्रंथभेट देत आले आहेत.
या कार्यक्रमास सर्व संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक ,पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728