ग्रामीण कथालेखक संजय खोचारे यांच्या कथेस तृतीय क्रमांक प्राप्त
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ग्रामीण कथालेखक संजय खोचारे यांच्या कथेस तृतीय क्रमांक प्राप्त 
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
मुरुक्टे (ता.भुदरगड) येथील ग्रामीण कथालेखक संजय खोचारे यांच्या ‘हाकसोड’ या ग्रामीण कथेस तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
पुणे येथील जेष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी किरात दिवाळी अंकासाठी कथालेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. किरात परिवारातर्फे रोख रक्कम व भेटवस्तू देऊन लवकरच विजेत्यांचा सन्मान होणार आहे. सर्व कथांचे परीक्षण जेष्ठ साहित्यिक वीरधवल परब यांनी केले. श्री.संजय खोचारे यांना जेष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांचे मार्गदर्शन लाभले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





