नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे ७ नोव्हेंबर रोजी शिक्षणतज्ज्ञ स्व.डी.बी.पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे ७ नोव्हेंबर रोजी शिक्षणतज्ज्ञ स्व.डी.बी.पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे ७ नोव्हेंबर रोजी
शिक्षणतज्ज्ञ स्व.डी.बी.पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
न्यू कॉलेज, कोल्हापूर आणि जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ मा.श्री.डी.बी.पाटील व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी शिक्षणतज्ज्ञ स्व. डी. बी. पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. स्पर्धेत एकूण २५ हजारहून अधिक रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत अशी माहिती प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के.जी‌.पाटील व न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही.एम‌.पाटील यांनी दिली. न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेसाठी, राजर्षी शाहू महाराजांचा शैक्षणिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ स्व. डी. बी. पाटील यांचे माध्यमिक शिक्षणातील योगदान, अवकाश संशोधन आणि भारत, समाजमाध्यमांच्या विळख्यात तरुणाई, भारतीय संस्कृती : काल आज आणि उद्या, वसुधैव कुटुंबकम, जागर स्त्रीशक्तीचा या सात विषयावर स्पर्धा होणार आहे. एका महाविद्यालयातील वरिष्ठ व पदव्युत्तर स्तरावरील म्हणून दोन स्पर्धकांना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी प्राचार्यांचे प्रवेशपत्र, विद्यार्थ्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड आवश्यक आहे. स्पर्धेचा कालावधी आठ मिनिटाचा आहे. स्पर्धकाचे वय २५ वर्षापर्यंत असावे. कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही‌.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १० हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकाला २ हजार रुपये व चषक, उत्तेजनार्थ प्रत्येकी १ हजार रुपयांची दोन बक्षीसे दिली जाणार आहेत. मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. न्यू कॉलेज येथे स्पर्धा होणार आहेत. हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी, शिक्षण उपसंचालक महेश चौथे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
या स्पर्धेसाठी नाव नोंदणी फी २०० रुपये व तात्काळ नोंदणी २५० रुपये इतकी आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी व फी ऑनलाईन भरता येणार आहे. यासाठी महाविद्यालयाचा ई-मेल nck30.cl@unishivaji.ac.in व बँक खाते तपशील बँक ऑफ महाराष्ट्र, खरी कॉर्नर, कोल्हापूर ६०२३२७८९१२८, ISFC Code MAHB000032असा आहे. व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख प्रा. विनय पाटील, स्पर्धेचे मुख्य समन्वयक प्रा. डॉ‌. कविता गगराणी, प्रा. अविनाश पाटील, प्रा. एस.एन.इनामदार, उपप्राचार्य कनिष्ठ विभाग डॉ.एस.एस. देशमुख, प्रा‌.डॉ‌.मनीषा नायकवडी, प्रा. उमा गायकवाड, प्रा.संग्राम पाटील, प्रा.प्रतिक चेंडके, रजिस्ट्रार श्रीमती एम. वाय. कांबळे, चेतन पाटोळे विशाल सरनाईक हे समितीचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930