इन्कम टॅक्सच्या किमान सुट रकमेत १० लाखापर्यंत वाढ करण्याची केंद्रीय अर्थमंत्री नाम. निर्मला सिताराम यांचेकडे मागणी : भरत रसाळे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
इन्कम टॅक्सच्या किमान सुट रकमेत १० लाखापर्यंत वाढ करण्याची केंद्रीय अर्थमंत्री नाम. निर्मला सिताराम यांचेकडे मागणी : भरत रसाळे
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना मिळणाऱ्या वार्षिक वेतनावर इन्कम टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स भरताना करावयाच्या किमान सूट रक्कमेत दहा लाखापर्यंत वाढ करावी अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री नामदार निर्मला सीताराम यांच्याकडे केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे .
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना मिळणाऱ्या वार्षिक वेतनावर इन्कम टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स भरताना करावयाची किमान वजावट पगार वाढेल त्या प्रमाणात वाढवली जाते. पण गेल्या आठ दहा वर्षापासून ही स्टॅंडर्ड वजावट फक्त तीन लाख रुपये इतकीच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा किमान दोन महिन्याचा पगार हा इन्कम टॅक्स भरण्यासाठीच जातो. हा सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्यावर अन्याय आहे. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार व ज्येष्ठ अर्थतज्ञांच्या मते ही वजावट वार्षिक आठ ते साडेआठ लाख रुपयापर्यंत असायला हवी पण ही वाढ केलेली नाही. त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मध्ये असंतोष आहे.
यामुळे चालू वर्षाच्या अंतिम बजेटमध्ये करपात्रतेसाठी सूट देणाऱ्या रकमेमध्ये दहा लाखापर्यंतची वाढ करावी. असे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री नाम. निर्मला सिताराम व मुख्य वित्तसचिव, भारत सरकार यांच्याकडे पाठविले असल्याची माहिती राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली. राज्यातील इतर सर्व संघटना प्रमुखांनी अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे देऊन हा प्रश्न धसास लावावा असे आवाहन त्यानी केले आहे .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
