नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरुन १६ नोव्हेंबरपासून सलग पाच दिवस ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे वैचारिक बंध प्रसारित होणार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरुन १६ नोव्हेंबरपासून सलग पाच दिवस ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे वैचारिक बंध प्रसारित होणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरुन १६ नोव्हेंबरपासून सलग पाच दिवस ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे वैचारिक बंध प्रसारित होणार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरुन दररोज सकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या “ऐसी रसिके” या रसिकप्रिय साहित्यिक कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे वैचारिक बंध प्रसारित होणार आहेत. शनिवार दि.१६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर असे सलग पाच दिवस विविध विषयांवरील पाच “वैचारिक बंध” ऐसी रसिके या कार्यक्रमातून जीवन साळोखे सादर करणार आहेत.
यापूर्वीही त्यांनी “ऐसी रसिके” या कार्यक्रमातून अनेक वेळा वैचारिक बंध सादर केले असून, त्यांना जाणकार श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विविध वृत्तपत्रांतून सातत्याने सदर लेखन करणाऱ्या जीवन साळोखे यांची आजवर पन्नास पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ग्रंथप्रसार, ग्रंथालय चळवळ आणि वाचन संस्कृती यासाठी *ग्रंथदान* हा उपक्रम, ग्रामीण आणि शहरी भागात, एकहाती गेली वीस वर्षे, ते शाळा महाविद्यालयांतून राबवत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात त्यासाठी त्यांची ख्याती आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930