नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कवयित्री सौ.सुजाता निंबाळकर यांच्या ‘गोंदण’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कवयित्री सौ.सुजाता निंबाळकर यांच्या ‘गोंदण’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कवयित्री सौ.सुजाता निंबाळकर यांच्या ‘गोंदण’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
श्री.मौनी विद्यापीठ संचलित उदाजीराव अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी व कवयित्री सौ.सुजाता निंबाळकर यांच्या ‘गोंदण’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा महाविद्यालयात उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री बी. बी. पाटील होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. स्वागत प्रास्ताविक श्री.विजय रघुनाथ सुतार यांनी केले, तर सूत्रसंचालन व मान्यवरांचे स्वागत सौ. राधिका कृष्णा शिंदे यांनी केले.
कार्यक्रमात लेखिकेचा व पुस्तकाचा परिचय सादर करण्यात आला.
सौ. जमिला मुल्ला यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘गोंदण’ कवितेवर आधारित आकर्षक AI सॉंग सादर करण्यात आले, ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सौ. जमिला मुल्ला, श्री प्रशांत निंबाळकर, सौ. मंजुषा माळी, श्री सुधीर गुरव, श्री कपिल पाटील व सौ. राणे यांनी मनोगत व्यक्त करत लेखिकेच्या साहित्यिक प्रवासाचे कौतुक केले. यावेळी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सौ.सुजाता निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात विद्यालयातूनच कविता लेखनाची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. शेवटी आभार सूर्यकांत डवर यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31