नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेणार : शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेणार : शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेणार : शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांच्यासमवेत बैठक आयोजित करून त्यांच्या मागण्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे आम. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना खाजगी शाळांच्या प्रश्नाबाबत निवेदन दिले व चर्चा केली. यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आम प्रा .जयंत आसगावकर, कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, सहाय्यक शिक्षण संचालक डॉ.गणपतराव कमळकर व सांगली, सातारा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांचे प्रलंबित प्रश्न मांडले. यामध्ये प्रामुख्याने मुख्याध्यापकांचा अर्जित रजेचे रोखीकरण, करणे, समायोजनांस स्थागिती असलेने शिक्षेकेतर कर्मचार्यांचे शिक्षण संचालक यांनी त्यांचे समायोजन थांबविणे, ज्या शिक्षकांची NPS व DCPS मध्ये प्रॉव्हिडंट फंड खाती नाहीत त्यांना 6 व्या व 7 व्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमा रोखीने मिळणे, संच मान्यता दुरुस्ती व पदे शिफ्टिंग करणेसाठी शिक्षणाधिकारी यांना टॅब उपलब्ध करून देणे, शिक्षकांचे आभा कार्ड निघेपर्यंत त्यांची वैद्यकीय बिले पारित करणे, 90 पटअसलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे पद संरक्षित करणे, अनुकंपा व न्यायालयीन निर्णयानुसार वैयक्तिक मान्यता दिलेल्या शिक्षकाला शालार्थ आयडी मिळणे, जनगणना कामात सहभागी असलेल्या शिक्षकांना बदली रजा मिळणे, 31 मार्च 2026 रोजी पारित न झालेली थकीत बिले पारित होणे, खाजगी शाळांचे वेतनेतर अनुदान मिळणे अशा मागण्यावर चर्चा केली.
यावेळी बोलताना आम. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांच्याबरोबर बैठक आयोजित करून हे प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले.
यावेळी राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते आम. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे, जिल्हाध्यक्ष कुमार पाटील, विभागीय अध्यक्ष महादेव डावरे व मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव दत्ता पाटील, विना अनुदानित कृती समितीचे बाबा पाटील, उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष इरफान अन्सारी, मुख्याध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे, सेनेचे सुनील जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31