नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गर्ल्स हायस्कूल, कळंब तर्फ ठाणे येथे ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ भेट, लेखक तुमच्या भेटीला संयुक्त कार्यक्रम संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गर्ल्स हायस्कूल, कळंब तर्फ ठाणे येथे ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ भेट, लेखक तुमच्या भेटीला संयुक्त कार्यक्रम संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गर्ल्स हायस्कूल, कळंब तर्फ ठाणे येथे ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ भेट, लेखक तुमच्या भेटीला संयुक्त कार्यक्रम संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कळंब तर्फ ठाणे
“वाचन संस्कृतीमधूनच विद्यार्थ्यांची अभ्यासू वृत्ती वाढेल. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.” असे उदगार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे यांनी काढले. ते गर्ल्स हायस्कूल कळंब तर्फ ठाणे (ता.करवीर ) येथे ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन, ग्रंथभेट आणि लेखक तुमच्या भेटीला अशा संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्षा श्रीमती एल. एस. सावंत होत्या. तर प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ रंगकर्मी संजय पाटील ( कोलोलीकर), मुख्याध्यापिका सौ. तनुजा वस्त्रद यांची होती.
यावेळी जीवन साळोखे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यांनी प्रशालेस चार हजार रु.किमतीचा दर्जेदार पुस्तकांचा संच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरीचे खंड आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत भेट दिले.
प्रारंभी ज्येष्ठ शिक्षक डी.जी. पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.प्राचार्य साळोखे यांच्या ग्रंथदान उपक्रमाची माहिती दिली. मुख्याध्यापिका सौ. वस्त्रद यांनी प्रास्ताविकात प्रशालेच्या वाटचालीचा आढावा घेतला.
यावेळी जीवन साळोखे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सविस्तर विशद करून, अवतीभवतीच्या घटना- प्रसंगातून कथा कशा साकार होतात,यांचे दाखले देत त्यांनी ते सुलभरित्या स्पष्ट केले. शेवटी ग्रंथपाल विलास साठे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास संस्थेच्या खजिनदार सौ.एस. एस. अडसूळ, तसेच ए.डी. तिबिले, एन. ए. देवणे,पी.एच, जाधव,सौ. एन.एस.पाटील, सौ.बी.एस.जाधव, श्रीमती एस.एन.जाधव इ.सह विद्यार्थीनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930