नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पर्यावरण रक्षणासाठी प्रभावी मार्गदर्शक गाथा ‘करू पर्यावरणाचे रक्षण.., थोपवू प्लास्टिकचे आक्रमण… लेखक : जीवन साळोखे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पर्यावरण रक्षणासाठी प्रभावी मार्गदर्शक गाथा ‘करू पर्यावरणाचे रक्षण.., थोपवू प्लास्टिकचे आक्रमण… लेखक : जीवन साळोखे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पर्यावरण रक्षणासाठी प्रभावी मार्गदर्शक गाथा ‘करू पर्यावरणाचे रक्षण.., थोपवू प्लास्टिकचे आक्रमण… लेखक : जीवन साळोखे
– अशोक म. वाडकर, आर्किटेक्ट इंजिनिअर, कोल्हापूर मो. ७०२०० ११४०८

प्राचार्य जीवन साळोखे हे ज्येष्ठ साहित्यिक, कवी व पत्रकार म्हणून सुपरिचित आहेत. कार्यकर्त्याचा पिंड असणारे श्री. साळोखे यांची, त्यांच्या ग्रंथदान उपक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही ख्याती आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी जीवनापासूनच त्यांनी आजतागायत सातत्यपूर्ण कविता, कथा, सामाजिक तसेच व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध विषयांवर दर्जेदार लेखन केलेले आहे. ते पुस्तकांच्या रूपाने रसिक वाचकांसाठी आकर्षकपणे वेळोवेळी उपलब्धही होत आले आहे. शिवाय ते पुस्तकप्रेमी, हाडाचे शिक्षक असल्याने “शहाणे करण्या सकळ जन, जोपासावे चौफेर वाचन” या व्यापक भूमिकेतून दीर्घकाळ वाचक व विद्यार्थ्यांसाठी “ग्रंथदान उपक्रम” नेकीने राबवत आले आहेत. २००६ ते सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या दीर्घ कालखंडात सुमारे अठरा हजारांवर पुस्तकांचे एकहाती “ग्रंथदान” करून श्री. साळोखे यांनी एकप्रकारे विक्रम प्रस्धापित केला आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतरही नव्या उमेदीने हा उपक्रम शाळा शाळांतून जाऊन, ते प्रत्यक्षात राबवत आहेत. आजकालच्या ‘मोबाईल क्रेझ’ व ‘डिजीटल प्रसार माध्यमां’च्या वाढत्या धोक्याच्या काळात, झपाट्याने लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीला बळ देण्याच्या व्यापक दृष्टीने त्यांचे हे कार्य सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी निश्चितच अनुकरणीय आणि उल्लेखनीय असेच आहे…!
आजच्या जगापुढे ठाकलेली प्रमुख समस्या ही “ग्लोबल वार्मिंग” अर्थात “जागतिक तापमान वाढीची” आहे. ‘ग्लोबल वार्मिंग’च्या अटळ दुष्परिणामापासून पृथ्वीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपणा सर्व मानवजातीवर येऊन ठेपली आहे. ही समस्या प्रचंड प्रमाणात उद्भवण्याचे कारण म्हणजे पर्यावरणाचा होत असलेला ह्रास होय..! या ह्रासाचे मूळ, नैसर्गिक संसाधनांच्या संख्यात्मक व गुणात्मक घट होण्यामध्ये आहे. ही घट लोकसंख्येचा वेगवान विस्फोट, अशाश्वत औद्योगिक विकासाची कास आणि तथाकथित आधुनिक समाजाची बदलत चाललेली जीवनशैली यामुळे होते आहे. शिवाय सामाजिक शिस्तीबाबत मानवाची बेफिकीरी व उदासीनता याही गोष्टी यास कारणीभूत आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जनजागरणासाठी प्रबोधन होण्याची नितांत आवश्यकता आहे. केवळ व्यापक लोकसहभागातूनच याचे निर्मुलन होणे शक्य आहे…!
जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून पर्वतराजीवरील बर्फाच्या वितळण्याने समुद्राच्या जलपातळीची होणारी बेसुमार वाढ, जल व ध्वनिप्रदूषण, हवा प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण पर्यावरणीय ह्रासास कारणीभूत आहे…! या संकटग्रस्त प्रदूषणास “मानव” हाच घटक सर्वस्वी जबाबदार आहे. मानव जातीबरोबरच वन्यजीवन, पशू-पक्षी, सागरी जीवन हेसुद्धा त्यामुळे धोक्यात आले आहे…!
आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातील विकासात प्लास्टिक उत्पादनांचा बेसुमार वापर हा कळीचा पर्यावरणीय अडथळा बनत चालला आहे. महाराष्ट्रात शासकीय पातळीवर त्यासाठी प्लास्टिक व थर्मोकोल बंदीचा कायदा दि.२३मार्च २०१८ रोजी मंजूर झाला आहे. तथापि केवळ कायद्याने व त्यातील दंड व शिक्षा या तरतूदींच्या धाकाने त्याचे पालन होणार नाही. त्यासाठी सर्वांनीच जागरूक राहून आपली प्रत्येकाची मानसिकता बदलली तरच हे शक्य होईल, यात शंका नाही…!
प्लास्टिक बंदीच्या या लोकचळवळीच्या यशस्वितेसाठी, वाचन चळवळीच्या वृद्धीचा ध्यास घेतलेले कृतिशील शिक्षक जीवन साळोखे यांनी या पुस्तकाची सुबोध निर्मिती केली आहे. त्यांची ही कृतिशीलता सफल होईल यात शंका नाही. कोल्हापूरच्या अभिनंदन प्रकाशन या नामवंत प्रकाशन संस्थेने या पुस्तकाची आकर्षक, देखणी निर्मिती केली आहे. अवघ्या एका वर्षातच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. लेखकाने हे पुस्तक पर्यावरण संरक्षण, स्वच्छता अभियान व प्लास्टिक मुक्तीसाठी अविरत झटणाऱ्या समर्पित सामाजिक कार्यकर्त्यांना अर्पण करुन,एका अर्थाने पर्यावरण रक्षणाच्या चळवळीला बळ दिले आहे…! तसेच पर्यावरण रक्षक, ज्येष्ठ वृक्षप्रेमी शिक्षक नामदेव चौगले यांच्या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्याचा आणि प्लास्टिकचे आक्रमण रोखण्यासाठी कापडी पिशव्या मोफत वाटण्याचा उपक्रम राबवणारे शिक्षक हरिश्चंद्र साळोखे यांच्या कार्याची गौरवपूर्ण नोंद घेतली आहे. चित्रकार निलेश खराडे यांच्या आशयपूर्ण मुखपृष्ठासह पुस्तकाची मांडणी वेधक आहे. ठळक ठशाच्या छपाई तंत्राने पुस्तक अधिकच आकर्षक व उपयुक्त ठरले आहे. सर्व स्तरातील वाचकांसह विद्यार्थ्यांनाही उपयुक्त असा महत्त्वपूर्ण मजकूर येथे आढळतो. त्यामुळे स्टार्ट टू एंड हे पुस्तक माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे…!
या पुस्तकात एकूण चौदा प्रकरणांमध्ये “पर्यावरण” हा विषय तपशिलवार माहितीने नेमकेपणाने स्पष्ट केला आहे. पर्यावरण ह्रासाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक हा घटक कारणीभूत आहे. भूमी, वायु, जल व ध्वनिप्रदूषण, घनकचरा प्रदूषण आदि विषयी तसेेच प्लास्टिक वापरामुळे होणारे भयंकर दुष्परिणाम यांची सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे. घनकचऱ्याचे, विशेषत: ऐरणीवरील प्लास्टिकच्या अनियंत्रित वापरामुळे डोकेदुखी ठरलेल्या आजच्या समस्येचे निराकरण करण्याचे उपाय यांचाही मार्गदर्शक ऊहापोह पुस्तकात करण्यात आला आहे.
“विकासाकडून विनाशाकडे…?” या शेवटच्या प्रकरणात पर्यावरणासंबंधीच्या एकंदर स्वरूपाचे उत्तम विश्लेषण केलेले आहे. शिवाय प्लास्टिकला उपलब्ध पर्याय, पर्यावरणासंबंधी साजरे केले जाणारे विशेष दिन व पर्यावरणपूरक घोषणा इ. माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. विषय महत्त्वपूर्ण आणि समस्या गंभीर असली तरी लेखकाने ओघवत्या भाषेत मांडणी केल्याने ते वाचनीय आहे. क्रमिक पुस्तकाप्रमाणे मांडणी केल्याने या पुस्तकाचे महत्त्व व उपयुक्तता याबाबत महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची प्रशस्तीही या पुस्तकास लाभली आहे. एकूणच हे पुस्तक म्हणजे “पर्यावरणाचे नवनीत” असल्याने, अभ्यासनीय व संग्राह्य तर आहेच, त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाची प्रभावी गाथा ठरले आहे…!!

पुस्तकाचे नाव : “करू पर्यावरणाचे रक्षण…थोपवू प्लास्टिकचे आक्रमण…!”
लेखक : जीवन साळोखे,
प्रकाशक : अभिनंदन प्रकाशन। कोल्हापूर,
पृष्ठे : ७२,* *किंमत : १६५ /-₹

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31