देशमुख हायस्कूलच्या कु.आरुष मुसळेचे शिष्यवृत्तीमध्ये लक्षवेधी यश
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
देशमुख हायस्कूलच्या कु.आरुष मुसळेचे शिष्यवृत्तीमध्ये लक्षवेधी यश

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
वसंतराव देशमुख हायस्कूल, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेचा विद्यार्थी कु.आरुष विनायक मुसळे याने इ. चौथी स्कॉलरशिप परीक्षेत (२०२६) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये २९८ पैकी २५४ गुण मिळवून १२१ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच इंग्रजी माध्यमांमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
कु. आरुष यांने यापूर्वी मंथन,बी.डी.एस. डी.टी एस. इ. शाळाबाह्य पूरक परीक्षेत इ.१ ली ते ४थी पर्यंत सातत्याने जिल्ह्यात आणि राज्यात गुणवत्ता यादीत येऊन घवघवीत यश मिळवले आहे. २०२६ च्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कमी कालावधी मिळूनही, इंग्रजी माध्यमांमध्ये त्याने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.
कु. आरुष मुसळे याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्याला या यशामध्ये संस्था सचिव शारंगधर देशमुख, प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुपा पास्ते, वर्गशिक्षिका वर्षा वेदान्ते, तिलोत्तमा कदम, दिपाली बाबर, रोहिणी पाटील आणि सर्व स्टाफ, त्याची आई सौ.सिद्धी विनायक मुसळे – साळोखे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





