नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीची पुण्यात बैठक; आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलनाचा इशारा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीची पुण्यात बैठक; आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलनाचा इशारा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीची पुण्यात बैठक; आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलनाचा इशारा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पुणे,
महाराष्ट्र राज्यातील २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीची राज्यस्तरीय बैठक साधना विद्यालय, हडपसर, पुणे येथे संपन्न झाली.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. यापूर्वी जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक आंदोलने करण्यात आली असूनही शासनाकडून अपेक्षित निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता आंदोलनाची अंतिम दिशा निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली. शासनाला अंतिम संधी देत दि. १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत काळ्या फिती लावून शालेय कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानंतर दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मूक मोर्चा काढून शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. तरीही शासनाने २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर दि. २८ सप्टेंबर २०२६ पासून आझाद मैदान, मुंबई येथे सहकुटुंब आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.
“जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या,” अशी टोकाची भूमिका घेण्याची वेळ शासनाने कर्मचाऱ्यांवर आणू नये, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शासनाने राज्यातील २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी प्रसाद गायकवाड, सुनिल भोर, सचिन नलवडे, बाबा पाटील, संजयमामा वाळे, दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, आण्णा गायकवाड, राहुल पवार, श्रीकांत पाटील, एम. आर. पाटील, मुकुंद कुंभार, सुरेश कानडे, पी. एस. पाटील, पोपट पाटील, के. एच. पाटील, शिवाजी लाड, अनिल चौगले,समाधान घाडगे, कल्याण बर्डे, संदेश राऊत, मंगेश जोशी आदी ११ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031