शिवराज महाविद्यालयात नेव्ही एन.सी.सी. युनिटचे उदघाटन संपन्न
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिवराज महाविद्यालयात नेव्ही एन.सी.सी. युनिटचे उदघाटन संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गडहिंग्लज (राजेंद्र यादव)
येथील शिवराज महाविद्यालयात ‘२ महाराष्ट्र नेवल युनिट’चे (नेव्ही एन.सी.सी.) उदघाटन भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर राजकुमार पुंडलिक केसरकर, कोल्हापूर एन.सी.सी. ग्रुपचे ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई यांच्या हस्ते तिरंगा रंगाचे फुगे आकाशात सोडून करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते.
प्रारंभी एन.सी.सी. विभाग प्रमुख मेजर डॉ.राहुल मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थी श्रुतिका कांबळे, आणि एन.सी.सी. कॅडेटनी देशभक्तीपर गीतावर नृत्य व दांडपट्टा व तलवारबाजीचा साहसी उपक्रम सादर केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अल्ताफ नाईकवाडे यांनी करून दिला. एन.सी.सी.चे माजी विद्यार्थी महेश पाटील यांना एन.सी.सी. ऑफिसरपदी निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर राजकुमार केसरकर यांनी मार्गदर्शन करताना जीवनात शिस्त महत्त्वाचे आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो. आयुष्यात येणाऱ्या संकटाना ध्येर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे. शिक्षणाचा पाया चांगला असणे गरजेचे आहे. ग्रंथालयातून ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञान घेऊन देशसेवेची भावना उज्वल ठेवावी. नवी पिढी भारतमातेच्या सेवेसाठी सज्ज व्हावी असे प्रतिपादन केले. लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई यांनी आपल्या मनोगतात एन.सी.सी.मधील आपली संधी आपल्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. आपण एन.सी.सी.मुळे खऱ्याअर्थी घडलो आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे यशस्वी होऊ शकतात यासाठी आपली जिद्द महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी एन.सी.सी.मधून आपले करिअर घडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी सर्वच उपक्रमात त्यांना सहभागी करून घेणे महत्वाचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यांशी सुसंवाद साधला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय जीवनातून आपले ध्येय साध्य करावे असे प्रतिपादन केले.
डॉ. अनिलराव कुराडे यांनी आजचा दिवस महाविद्यालयाच्या जीवनामध्ये मानाचा दिवस आहे. नेव्ही. एन.सी.सी.शुभारंभ झाला. शिवराज विद्या संकुलासाठी हा आनंदाचा, स्वाभिमानाचा दिवस आहे. वायू दलाची एन.सी.सी. सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष श्री के. जी.पाटील, ॲड.दिग्वीजय कुराडे, संचालिका, नगरसेविका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, संचालक के. व्ही. पेडणेकर, एम.के.सुतार, बसवराज आजरी, प्रा.विश्वजीत कुराडे, प्राचार्य डॉ.एस. एम. कदम यांच्यासह तालुका आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी, उपप्राचार्य प्रा.तानाजी चौगुले. ग्रंथपाल श्री संदीप कुराडे. एन.सी.सी.चे ए.एन.ओ.विनायक नाईक, तानाजी पाटील, श्री.गावीत, एन.सी.सी.कॅडेट सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार प्रा. सुजाता जांगनुरे यांनी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





