नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘यांनी घडवले समृद्ध मराठी साहित्य’ : मराठी साहित्यविश्वाचा एक अनमोल दस्तऐवज! लेखक : प्राचार्य जीवन साळोखे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

‘यांनी घडवले समृद्ध मराठी साहित्य’ : मराठी साहित्यविश्वाचा एक अनमोल दस्तऐवज! लेखक : प्राचार्य जीवन साळोखे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

‘यांनी घडवले समृद्ध मराठी साहित्य’ : मराठी साहित्यविश्वाचा एक अनमोल दस्तऐवज!
लेखक : प्राचार्य जीवन साळोखे
प्रकाशक : अभिनंदन प्रकाशन, मंगळवार पेठ, कोल्हापूर
पुस्तक परिचय : प्रा. सुषमा पाटील, कोल्हापूर

मराठी साहित्य ही केवळ शब्दांची संपत्ती नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, विचारांची, संवेदनांची आणि सामाजिक जाणिवांची अमूल्य ठेव आहे. या साहित्यविश्वाला आपल्या प्रतिभेने, लेखणीने आणि विचारसामर्थ्याने समृद्ध करणाऱ्या उल्लेखनीय साहित्यिकांच्या कार्याचा परिचय करून देणारा ‘यांनी घडवले समृद्ध मराठी साहित्य’ हा चरित्रसंग्रह म्हणजे मराठी साहित्याच्या वैभवशाली परंपरेचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.
लेखक प्राचार्य जीवन साळोखे यांनी या ग्रंथातून तब्बल शंभर निवडक प्रतिभावंत साहित्यिकांच्या कार्याचा आणि योगदानाचा मागोवा घेत हे चरित्र लेखन केले आहे. त्यांच्या लेखनातून साहित्यिकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची साहित्यसेवा आणि मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये त्यांनी दिलेले योगदान समजून घेण्याची संधी वाचकांना यानिमित्ताने मिळते. साहित्य संमेलनांच्या उज्ज्वल परंपरेची नोंद आणि विविध साहित्यिकांची माहिती यांमुळे या ग्रंथाला ऐतिहासिक दस्तावेजाबरोबर संदर्भमूल्यही प्राप्त झाले आहे…!
काळाच्या प्रवाहात अनेक साहित्यिकांची नावे, त्यांचे विचार आणि त्यांचे योगदान नव्या पिढीच्या स्मरणातून दूर जाण्याची शक्यता असते. अशा वेळी त्यांच्या कार्याची नोंद घेऊन ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हे केवळ लेखनाचे काम नसून सांस्कृतिक आणि साहित्यिक जपणुकीचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. जीवन साळोखे यांनी हा ग्रंथ साकारताना हीच साहित्यनिष्ठा जपल्याचे पानोपानी जाणवते.
या ग्रंथाचे आणखी एक महत्त्व म्हणजे तो वाचकांना मराठी साहित्याच्या विस्तृत विश्वाची ओळख करून देतो. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, युवा संशोधकांना, साहित्यप्रेमींना आणि नवोदित लेखकांना या ग्रंथातून निश्चितच प्रेरणा मिळू शकते. साहित्यिकांचे कार्य जाणून घेताना वाचकांना मराठी भाषेचा अभिमान वाटतो, तसेच साहित्यनिर्मितीमागील प्रतिभा, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी यांचीही जाणीव होते.
१८५० ते १९५० या शंभर वर्षातील शंभर नामवंत, प्रतिभाशाली साहित्यिकांचे चरित्र या संग्रहात नेमकेपणाने मांडले आहे.मराठी भाषेतील विविध साहित्यप्रकारात यशस्वी योगदान देणाऱ्या महत्त्वपूर्ण शंभर सारस्वतांचे हे चरित्र जास्तीत जास्त अचूक संदर्भ देत, वाचकांसमोर ठेवले आहे.त्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक, समीक्षा, समाजप्रबोधन, ललित निबंध, चरित्र, नाट्यछटा इ. विविध साहित्यप्रकारात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविणाऱ्या साहित्यिकांविषयी , आवश्यक त्या सर्व माहिती – संदर्भासह आटोपशीर लेखन केले आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हा चरित्र संग्रह प्रसिद्ध होत आहे, ही घटना केवळ औचित्यपूर्ण नाही तर, खऱ्या अर्थाने माय मराठीच्या उज्ज्वल परंपरेचा यथार्थ जागर आहे…!
ग्रंथदानातून वाचन संस्कृती, वाचन संस्कार, वाचन प्रोत्साहन आणि समृद्ध शालेय ग्रंथालयाचा जागर करणाऱ्या जीवन साळोखे यांच्या कृती आणि उक्तीं यांचा सुवर्णसंगम म्हणजे हा अभ्यासपूर्ण, वाचनीय ग्रंथ आहे…! कोणत्याही प्रकारच्या अभिनिवेशाचा या लेखनातून लवलेशही प्रकट होत नाही, तसेच पाल्हाळ टाळून प्रवाही शैलीत केलेले हे लेखन या चरित्रसंग्रहाचे मोठे वैशिष्ट्य ठरले आहे….!
या चरित्रसंग्रहाची उच्च दर्जाची निर्मितीमुल्ये लक्षवेधी आहेत. मजबूत, टिकाऊ पुठ्ठा बाइंडिंग, कलात्मक मांडणी, अर्थपूर्ण मुखपृष्ठ आणि सुबक छपाई यामुळे या संग्रहाचे देखणेपण अधिकच उठून दिसते. सामान्य वाचकांपासून ते जाणकार अभ्यासकांपर्यंत, नव्या पिढीतील शिक्षकांपासून ते व्यासंगी मान्यवरांपर्यंत हा चरित्रसंग्रह दिशादर्शक ठरणारा आहे, हे नक्की..! थोडक्यात, विद्यार्थी, शिक्षक, मराठी साहित्याचे अभ्यासक आणि पालक या सर्व घटकांनी हा चरित्र संग्रह वाचलाच पाहिजे,इतका तो महत्त्वाचा आहे.
एखाद्या साहित्यिकाची खरी ओळख, केवळ त्याच्या नावात नसते, तर त्याने समाजमनावर उमटवलेल्या विचारांच्या ठशात असते. त्या ठशांचा शोध घेणारा आणि साहित्यिकांच्या योगदानाची नोंद जपणारा हा ग्रंथ मराठी वाङ्मयाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकतो.त्यांना सखोल अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो.
शब्दांच्या माध्यमातून साहित्यिकांना जिवंत ठेवणे, त्यांच्या कार्याची ओळख समाजापर्यंत पोहोचवणे आणि मराठी साहित्याची परंपरा पुढील पिढीकडे सुपूर्द करणे, हे या ग्रंथाचे. बहुमोल वैशिष्ट्य आहे. जीवन साळोखे यांनी केलेल्या या साहित्यिक कार्याबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत . त्यांच्या लेखणीतून असेच मौलिक, संदर्भसमृद्ध आणि साहित्यप्रेम वाढवणारे ग्रंथ निर्माण होत राहोत, ही सदिच्छा…! दक्षिण महाराष्ट्रातील नामवंत प्रकाशक अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर यांनी या चरित्रग्रंथाची निर्मिती उच्च दर्जाची करताना कुठलाही हातचा ठेवलेला नाही, हे हा चरित्रसंग्रह हाती घेताच जाणकारांच्या लक्षात येते. मराठी साहित्याचा वारसा जपणाऱ्या या ग्रंथाला, त्याच्या प्रकाशकांना आणि त्यामागील जीवन साळोखे यांच्या साहित्यनिष्ठेला मनःपूर्वक सलाम…!

प्रकाशक : अभिनंदन प्रकाशन, मंगळवार पेठ, कोल्हापूर
पृष्ठसंख्या : ३२०
किंमत:- ८२० /₹
सवलत मूल्य :- ३००/-₹ फक्त

– प्रा. सुषमा अरुण पाटील
जि.प.कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30