नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जवाहर हायस्कूल निळपणचे मुख्याध्यापक सागर पाटील यांना जाहीर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जवाहर हायस्कूल निळपणचे मुख्याध्यापक सागर पाटील यांना जाहीर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जवाहर हायस्कूल निळपणचे मुख्याध्यापक सागर पाटील यांना जाहीर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी जवाहर हायस्कूल, निळपण (ता.भुदरगड) शाळेचे मुख्याध्यापक श्री. सागर बाबुराव पाटील यांची निवड झाली आहे. त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर झाल्याने भुदरगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
श्री. सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
श्री. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक एकमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे. शाळेने हीरक महोत्सवी वाटचालीत पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासह सुमारे ३६ लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव साधला आहे. उपक्रमशील शाळा म्हणून ओळख निर्माण करताना पर्यावरण दिनानिमित्त साडेतीन हजार सीटबॉल्स निर्मिती, स्काऊट गाईड विषयांतर्गत दरवर्षी निवासी शिबिराचे आयोजन, दीपावली मध्ये पर जिल्ह्यातून येणाऱ्या ऊस कामगारांना फराळ आणि कपडे वाटप कार्यक्रम, शाळेच्या माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेमध्ये सातत्याने गौरव, वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांच्याशी हितगुज साधून सिधा पुरवणारी, दरवर्षी सीमेवर सैनिकांना राख्या पाठवणारी, अंधशाळेतील विद्यार्थ्यांच्या सोबत रक्षाबंधन साजरी करणारी शाळा, चिखल महोत्सव, भात लागण ते कापणी पर्यंतचा प्रत्यक्ष अनुभव देणारी, माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातून लाखोंचा शैक्षणिक उठाव, इंग्रजीची झोपडी वाचनाची गोडी या सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमासह दहावीच्या बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. तसेच एनएमएमएस शिष्यवृत्ती, इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच बौद्धिक, शारीरिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास साधण्यावर त्यांचा विशेष भर आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत. त्यांना कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा ‘कोजिम आदर्श पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण शनिवार १४ नोव्हेंबर २०२६ रोजी स. ११.३० वाजता बोर्डी, ता. डहाणू, जि. पालघर येथे आयोजित मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.संग्रामसिंह कडव यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30