कन्या शाळेच्या जागेवर बहुउद्देशिय शैक्षणिक संकुल उभारावे : संघटना प्रतिनिधींची आम.आबिटकर यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे मागणी
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कन्या शाळेच्या जागेवर बहुउद्देशिय शैक्षणिक संकुल उभारावे : संघटना प्रतिनिधींची आम.आबिटकर यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे मागणी
गारगोटी प्रतिनिधी
गारगोटी येथील कन्या शाळेचे पागा शाळेच्या नवीन इमारतीत लवकरच स्थलांतर होणार असल्याने रिकाम्या होणाऱ्या कन्या शाळेच्या जागेचा वापर शैक्षणिक कारणासाठी व्हावा येथे बहुउद्देशिय शैक्षणिक संकुल उभारावे अशी मागणी भुदरगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना प्रतिनिधीनी शिष्टमंडळाद्वारे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.
प्रारंभी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे व्हा. चेअरमन मिलिंद पांगिरेकर यांनी भुदरगड तालुक्यातील शैक्षणिक उपक्रमांसाठी सभागृह नसल्याने अडचणी निर्माण होतात. ब्रिटिशकालीन शाळा असलेल्या कन्या शाळेचे स्थलांतर पागा शाळेच्या नवीन इमारतीत होणार आहे. या जागेवर बहुउद्देशिय शैक्षणिक संकुल उभारले तर तालुक्याच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी निश्चित उपयोग होणार आहे.
गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे म्हणाले, ब्रिटिशानी भुदरगड किल्यावरील कचेरी व अन्य कार्यालये गारगोटीत हलविण्याचा निर्णय सन १८७६ मध्ये घेतला व श्री.जोतिबा देवालयाजवळ ४ खोल्यांची प्राथमिक शाळा बांधली. १८९७ मध्ये या शाळेत मुलींचे स्वतंत्र वर्ग भरविण्याचा आदेश शाहू महाराजांनी देऊन कोल्हापूर संस्थानातील पहिली मुलीची शाळा ‘कन्या शाळा, गारगोटी येथे सुरु केली.
तर सन १८९७ मध्ये छ.राजर्षि शाहू महाराज भुदरगड दौऱ्यावर असताना पागा इमारतीमध्ये मुक्कामास थांबले होते. त्यावेळी तेथे घोडी बांधली जात असत. या इमारतीत प्राथमिक शाळा सुरू करण्याचा त्यांनी आदेश दिला. जी ‘आजही ‘पागाशाळा’ म्हणून ओळखली जाते. आता कन्या शाळेचे पागा शाळेच्या नवीन इमारतीत लवकरच स्थलांतर होणार असल्याने या जागेवर बहुउद्देशिय शैक्षणिक संकुल व्हावे.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे यांचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र शिंदे व सौ.सविता चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बी. एस.पाटील, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष वजीर मकानदार यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, शिक्षक नेते आनंदराव जाधव, रवींद्र नागटीळे, बी.एस.पाटील, कोजीमाशीचे संचालक पांडुरंग हळदकर, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष शशिकांत कासार, अमर देसाई, प्रवीण नलवडे, के.ए. देसाई, व्ही.जे.कदम, डी.एस.देसाई, तानाजी सणगर, नानासो देसाई, संजय कुकडे, बाबुराव कांबळे, एम. व्ही.लाड, अभिजित पोवार, राजू पाटील, नामदेव चव्हाण संजय कांबळे हिंदुराव मातले यांच्यासह प्राथमिक, माध्यमिक शाळातील सर्व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. शेवटी विजयराव रामाणे यांनी आभार मानले.
फोटो : एम. पी. एस. सी.मार्फत झालेल्या उपशिक्षणाधिकारी परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे यांचा सत्कार करताना आमदार प्रकाश आबिटकर सोबत संघटना प्रतिनिधी
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





