*मुख्याध्यापक संघाच्या वतीने सोमवार २५ सप्टेंबर रोजी नूतन मुख्याध्यापकांचा आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार समारंभ : शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ.एकनाथ आंबोकर यांचे प्रमुख मार्गदर्शन, अध्यक्षस्थान डी.बी.पाटील विचार मंचचे अध्यक्ष व्ही.जी.पोवार भूषविणार*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मुख्याध्यापक संघाच्या वतीने सोमवार २५ सप्टेंबर रोजी नूतन मुख्याध्यापकांचा आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार समारंभ : शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ.एकनाथ आंबोकर यांचे प्रमुख मार्गदर्शन, अध्यक्षस्थान डी.बी.पाटील विचार मंचचे अध्यक्ष व्ही.जी.पोवार भूषविणार

कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्ह्यातील नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते व डी.बी.पाटील शैक्षणिक विचार मंचचे अध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.व्ही.जी. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.२५ सप्टेंबर रोजी स.११.३० वा. विद्याभवन, कोल्हापूर येथे आयोजित केला असून यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ.श्री.एकनाथ आंबोकर प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती संघाचे चेअरमन श्री.सुरेश संकपाळ यांनी दिली.
यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष श्री.एस.डी.लाड, शिक्षक भारतीचे पुणे विभाग अध्यक्ष श्री. दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन श्री.बी.जी. काटे, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, कोल्हापूरचे अध्यक्ष श्री.बी.जी. बोराडे, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन श्री.के.बी.पोवार, कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष श्री. खंडेराव जगदाळे, कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष श्री.बाबा पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती श्री. विलास साठे, खाजगी प्राथमिक शाळा समितीचे राज्याध्यक्ष श्री.भरत रसाळे, मुख्याध्यापक महामंडळाचे आजीव सदस्य श्री. डी. एस. पाटील, आश्रमशाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष श्री. शिवाजी कोरवी, मुख्याध्यापक संघाचे माजी व्हा.चेअरमन श्री. प्रतापराव देशमुख, मुख्याध्यापक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष श्री. एन. आर. भोसले, गणित विषय समितीचे माजी चेअरमन श्री. डी. बी. टारे, मुख्याध्यापक संघाचे माजी व्हा.चेअरमन श्री.एन. बी. पाटील यांच्यासह आजी, माजी पदाधिकारी, मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत. तरी नूतन मुख्याध्यापकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





