श्री.चौंडेश्र्वरी हायस्कूल येथे माहिती अधिकार दिन साजरा
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
श्री.चौंडेश्र्वरी हायस्कूल येथे माहिती अधिकार दिन साजरा
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
श्री.चौंडेश्र्वरी हायस्कूल हळदी (ता. कागल) येथे माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. जी. के. भोसले होते.
यावेळी बोलताना श्री. आर. एल. पाटील म्हणाले, ‘माहितीचा अधिकार सर्वप्रथम स्वीडन देशांमध्ये १७६६ मध्ये फ्रीडम फॉर प्रेस ऍक्ट नावाने सुरू झाला. त्यानंतर अमेरिका, डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे, फ्रान्स, कॅनडा, स्पेन, जपान या देशाने माहितीच्या अधिकाराचे कायदे केले. संयुक्त राष्ट्र संघाने देखील १९४८ च्या आमसभेत त्याची घोषणा केली. यामुळे नागरिकांना माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य मिळाले. २८ सप्टेंबर २००३ मध्ये फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्क या नावाने बल्गेरिया मध्ये माहिती अधिकाराने भारलेल्या संघटना आणि कृती संघटना कृती गटांचे एक नवे कृतिशील संघटनजाळे उभारण्यात आले. तेव्हापासून हा दिन माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र शासनाने देखील २० सप्टेंबर २००८ च्या शासन निर्णयाने हा २८ सप्टेंबर माहिती अधिकार दिवस म्हणून घोषित केला.
याद्वारे कामाची तपासणी, दस्तऐवज, रेकॉर्ड किंवा रेकॉर्डच्या नोट्स, किंवा प्रमाणित प्रती. नागरिकांना मिळू शकतात. देशात माहितीचा अधिकार कायदा २००५ मध्ये पारित करण्यात आला. यामुळे सरकार आणि त्याच्या कार्यकर्त्यांना अधिक जबाबदार आणि जबाबदार बनवले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. जी. के. भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत आरुषी इंदलकर, अनुष्का इंदलकर, अंकिता आरागडे, गीता मोरे, श्रेया लाड, केतकी भराडे यांनी सहभाग घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट देण्यात आल्या. प्रारंभी स्वागत श्री. एम. के. घस्ते यांनी तर आभार सौ. बी. एम. सुतार यांनी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





