*गडहिंग्लज येथे शिंदे हायस्कूल येथे शुक्रवारी ११ माध्यमिक शाळांना ग्रंथदान उपक्रमांतर्गत जीवन साळोखे दोनशे पुस्तके भेट देणार*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*गडहिंग्लज येथे शिंदे हायस्कूल येथे शुक्रवारी ११ माध्यमिक शाळांना ग्रंथदान उपक्रमांतर्गत जीवन साळोखे दोनशे पुस्तके भेट देणार*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गडहिंग्लज
ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक जीवन साळोखे यांचेकडून शालेय ग्रंथालय समृद्धी आणि वाचन प्रोत्साहनासाठी, त्यांच्या अखंड सुरु असणाऱ्या, ग्रंथदान उपक्रमांतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील ११ माध्यमिक शाळांना सुमारे दोनशे वाचनीय पुस्तके भेट दिली जाणार आहेत. विजयमाला शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज येथे शुक्रवार दि.६ ऑक्टोबर रोजी पुस्तके भेट समारंभ होणार आहे.
ग्रंथदान उपक्रमांतर्गत या ग्रंथभेट कार्यक्रमात, संबंधित हायस्कूल्सना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.श्रीकांत नाईक, गडहिंग्लज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी
नवलकुमार हालबागोळ यांचे हस्ते पुस्तके भेट देण्यात येणार आहेत. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.जयश्री संतोष तेली उपस्थित राहणार आहेत.
यावेळी तालुक्यातील यशोदाबाई घोरपडे हायस्कूल, गडहिंग्लज, परिश्रम हायस्कूल,दुंडगे, सौ. वि.दि.शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज, हनिमनाळ हायस्कूल,हनिमनाळ, पार्वती हायस्कूल,औरनाळ, एस्. डी. हायस्कूल,मुत्नाळ, एस. एम.हायस्कूल बसर्गे,
शिवराय हायस्कूल नंदनवाड, जरळी हायस्कूल,जरळी, न्यू इंग्लिश स्कूल, मुगळी,
रामलिंग हायस्कूल, नूल यांना पुस्तक संच देण्यात येणार आहे. तरी संबंधित शाळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकानी केले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





