*मुख्याध्यापक संघात गुरुवर्य स्व.डी.डी.आसगावकर यांच्या तैलचित्राचे अनावरण : शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*मुख्याध्यापक संघात गुरुवर्य स्व.डी.डी.आसगावकर यांच्या तैलचित्राचे अनावरण : शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्याभवन, कोल्हापूर येथे कै.गुरुवर्य श्री.डी.डी.आसगावकर यांच्या तैलचित्राचा अनावरण समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन बी.जी.काटे होते. यावेळी अनेक मान्यवरांनी गुरुवर्य स्व.डी.डी.आसगावकर यांच्या कार्यास आपल्या मनोगतातून उजाळा दिला.
प्रारंभी कै.गुरुवर्य श्री.डी.डी. आसगावकर यांच्या तैलचित्राचे अनावरण संघाचे माजी चेअरमन बी.जी.काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री.बी.जी.काटे म्हणाले, स्व.डी.डी.आसगावकर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. तैलचित्राच्या रूपाने स्व.डी.डी.आसगावकर यांचे स्मरण होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची व समाधानाची बाब आहे.
आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक संघाचे आभार मानत स्व.डी.बी.पाटील व स्व.डी.डी.आसगावकर यांच्या विचाराने संस्थेचे कार्य चालावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षक नेते दादा लाड म्हणाले, स्व.डी.डी.आसगावकर यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्राला वाहून घेणारे ते एक कुशल नेतृत्व होते. त्यांचे तैलचित्र मुख्याध्यापक संघात लागणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी सांगरुळ शिक्षण संस्थेचे श्री.डी.एन.कुलकर्णी, एम.के.आळवेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड, संघाचे माजी चेअरमन के.बी.पोवार, सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत लहुजी खाडे, श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष बी.जी.बोराडे, कायम विनानुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, बाजार समितीचे माजी उपसभापती विलास साठे, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, कोजीमाशिचे चेअरमन बाळ डेळेकर, संघाचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडिटर इरफान अन्सारी, ए.एम.पाटील, डी. एस.पाटील, के.के.पाटील, उदय पाटील, आर.वाय.पाटील, एन.बी.पाटील, डी.पी.कदम, शिवाजी कोरवी, के.ए.देसाई, डी.एस.देसाई, के.ना.जाधव, डी.जी.खाडे, बी.आर.नाळे, सुभाष कलागते, मुख्याध्यापक संजय पाटील, एस.एम.नाळे, एन.बी.सुतार, संघाचे संचालक एस.एस.चव्हाण, बबन इंदुलकर, सुरेश उगारे, शिवाजी माळकर, पी.बी.भारमल, श्रीकांत पाटील, जनार्दन दिंडे, बसवराज वस्त्रद, सौ.अनिता नवाळे, जयसिंग पोवार, मनोहर पाटील, गजानन काटकर, श्रीधर गोंधळी यांच्यासह सांगरुळ शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्व.डी.डी.आसगावकर पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्यासह आसगावकर कुटुंबीय उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे चेअरमन श्री.सुरेश संकपाळ यांनी आभार स्व.डी.बी.पाटील विचार मंचचे अध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक संघाचे व्हा. चेअरमन मिलिंद पांगिरेकर यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





