*कागल येथे ९ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन : शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*कागल येथे ९ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन : शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच साहित्य क्षेत्राची ओळख व्हावी आणि त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या बालमनावर सुसंस्कार कोरले जाऊन आदर्श पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन हा अनोखा उपक्रम कागल येथील डी. आर. माने महाविद्यालयात सोमवार दि. ९ रोजी पार पडत आहे. जिल्ह्यातील असे हे पहिलेच साहित्य संमेलन असून शिक्षण विभागाच्या या अनोख्या उपक्रमाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.
राज्याला व देशाला उत्तम दर्जाच्या साहित्य क्षेत्राची परंपरा लाभली असून शालेय दशेतच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलांना प्रेरित करण्यासाठी साहित्य संमेलनाची आवश्यकता असते. यांसह याच मुलांना घडवणाऱ्या शिक्षकांमध्येही विविध कलागुण असतात. त्यांच्या त्या कलागुणांना वाव देणारे सक्षम व्यासपीठ म्हणजे साहित्य संमेलन होय. म्हणूनच समाजाच्या विधायक प्रवासातील महत्त्वाचे घटक असणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन सुरु करण्याचा अनोखा व आदर्शवत उपक्रम कागल येथे पहिल्यांदाच संपन्न होत आहे.
शिक्षण विभाग पंचायत समिती कागल, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर व डी. आर. माने महाविद्यालय कागल यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन संपन्न होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कवी व वक्ते इंद्रजीत भालेराव असणार आहेत. तर स्वागताध्यक्षपदी प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले आहेत. उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते होईल.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, दमसाचे कार्यवाहक डॉ. विनोद कांबळे, साहित्यिक चंद्रकांत निकाडे, बालसाहित्यिक श्रीमती नीलम माणगावे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक व साहित्य रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी केले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





