*माध्यमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी ऑनलाईन प्रणालीव्दारे ऑनलाईन जमा*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*माध्यमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी ऑनलाईन प्रणालीव्दारे ऑनलाईन जमा*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन फास्टसीएमपी’ ऑनलाईन प्रणालीव्दारे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन चेक क्लिअरिंग पद्धतीने होत होते. त्याशिवाय ही एकूणच प्रक्रिया विलंबाची होती. या पार्श्वभूमीवर शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन ‘फास्टसीएमपी’ ऑनलाईन प्रणालीव्दारे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचे वेतन या प्रणालीव्दारे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची शालार्थ प्रणालीमध्ये असलेली बँक खाती, माहिती अचूक असल्याची खात्री मुख्याध्यापक यांनी करून शिक्षण विभागास याबाबत माहिती सादर केली. त्या माहितीच्या आधारे सप्टेंबरचे वेतन जमा करण्यात आले.
शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेतन पथक अधीक्षक श्री.प्रवीणकुमार फाठक, वेतन पथकातील कर्मचारी व सर्व शिक्षक संघटना यांच्यातील समन्वयामुळे जिल्ह्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खात्यात जमा केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





