*श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पाटकर इंजीनियरिंग आणि झटका पापड केंद्रास भेट*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पाटकर इंजीनियरिंग आणि झटका पापड केंद्रास भेट*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायाची ओळख व्हावी या उद्देशाने गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाटकर इंजीनियरिंग आणि झटका पापड केंद्र या दोन उद्योग संस्थांना भेट दिली. यावेळी पाटकर इंजिनिअरिंगच्या राजा हाॅलर व राणी पिठाची चक्की या उद्योगांना तर झटका पापड केंद्रास भेट दिली.
या व्यवसायाचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते हे पाहिले. तसेच व्यवसायाची उत्पादने कोणकोणत्या ठिकाणी विक्रीसाठी वितरित होतात याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
पाटकर इंजिनिअरिंगमध्ये राजा हाॅलर व राणी पिठाची चक्की ही उत्पादने घेतली जातात. त्यांची उत्पादने फक्त भारतातच नव्हे तर अख्ख्या जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली जातात. त्यांचे उत्पादन कसे होते, पॅकिंग कसे होते, माल कशा पद्धतीने विक्रीसाठी पाठवला जातो याबाबतची सविस्तर माहिती व्यवसायाचे मालक श्री. केदार पाटकर यांनी दिली.
महिलांनी आपल्या आवडीनिवडी जोपासण्याबरोबरच आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे असे मत उद्योजका सौ.केतकी घनःश्याम ठाकूर यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आत्मविश्वासाबरोबरच चिकाटी असणे गरजेचे आहे. आणि आपण सतत संशोधन करणे गरजेचे असते. तरच आपण व्यवसायावरील पकड मजबूत करू शकतो. कच्चा कैरीच्या सरबतापासून सुरू झालेला व्यवसाय आज कैरी, माईन मुळा, लिंबू, आवळा अशी विविध प्रकारची लोणची, तसेच शुद्ध हळद आणि तांदूळ, नाचणी, उडीद, पोहे इत्यादी प्रकारचे पापड उत्पादने घेताना दिसून येतो. पापड केंद्राचे ही उत्पादने अतिशय शुद्ध स्वरूपाची असून स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. उत्पादनाच्या दर्जा बरोबरच त्याचे आर्थिक धोरणे हे व्यवस्थितपणे आखावी लागतात. याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांनी समजावून घेतली. यशस्वी उद्योजकाच्या अंगी कोणती गुणवैशिष्ट्ये असावीत याचे प्रत्यक्ष दर्शन मुलांना या भेटी दरम्यान घडून आले. कोणताही व्यवसाय हा लगेचच यशस्वी होतो असे नाही तर विविध प्रकारच्या अडचणी या व्यवसायामध्ये येतच असतात. आणि त्यांना सामोरे जातच व्यवसाय वृद्धिंगत करावा लागतो याची माहिती विद्यार्थ्यांना कळून आली.
यावेळी प्रा.शेखर देसाई, प्रा.सौ.तृप्ती पाटील, प्रा.सौ.स्मिता पाटील, प्रा.सौ. रोहिणी निकम, प्रा.सौ.स्नेहा साळोखे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





