*शिवाजी विद्यापीठांतर्गत आबिटकर कॉलेजचे दुरशिक्षण केंद्र प्रथम*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*शिवाजी विद्यापीठांतर्गत आबिटकर कॉलेजचे दुरशिक्षण केंद्र प्रथम*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगाव
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर दुरशिक्षण विभागातील प्रथम वर्ष प्रवेशामध्ये श्री. आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दुरशिक्षण विभागाने प्रथम क्रमांक पटकवला.
शिवाजी विद्यापीठ दूरशिक्षण विभागाची कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व सातारा अशा तीन जिल्ह्यांत केंद्रे आहेत. त्यामधून नविन केंद्र असलेल्या श्री.आनंदराव आबिटकर दुरशिक्षण केंद्र, कडगांव या केंद्राने प्रथम वर्ष प्रवेशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रथम वर्षासाठी १०१ प्रवेश झाले आहेत.
युवा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर, श्री.अवधूत परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी, दुरशिक्षण विभागाचे केंद्रसंचालक प्रा. खवरे, सहाय्यक श्री.भुतल तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





