शालेय विद्यार्थ्यांकडून ध्वजनिधीची सक्ती करु नये मुख्याध्यापक संघाची मागणी : ध्वजनिधी ऐश्चिक असल्याने सक्ती न करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आदेश
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शालेय विद्यार्थ्यांकडून ध्वजनिधीची सक्ती करु नये मुख्याध्यापक संघाची मागणी : ध्वजनिधी ऐश्चिक असल्याने सक्ती न करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आदेश
कोल्हापूर
सैनिक कल्याण विभागामार्फत माध्यमिक शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ५० रुपये सशस्त्र सेना ध्वजनिधी जमा करण्याचा आदेश रद्दबादल करावा, निधी संकलनाची सक्ती करु नये अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी ऐश्चिक असून विद्यार्थ्यांना सक्ती करु नये. स्वइच्छेने मिळणारा निधी संकलित करावा असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सशस्त्र सेना ध्वजनिधी प्रती विद्यार्थी ५० रुपये जमा करण्याचा आदेश विद्यार्थ्याच्या दृष्टीकोनातून अन्यायकारक व अवाजवी आहे. तो रद्दबादल करावा व नवीन आदेश निर्गमित करावा अशी विनंती करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा या बहुतांशी डोंगराळ व खेडोपाडी वसलेल्या आहेत. शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे शेतकरी, भूमीहीन, कष्टकरी, कामगार, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील आहेत. शाळांना शालेय परीक्षेची व अन्य स्पर्धा परीक्षांची फी गोळा करताना अडचणी येतात व वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या आदेशाप्रमाणे प्रतिविद्यार्थी ५० रुपये सशस्त्र ध्वज निधी संकलित करणे हे विद्यार्थी आणि पालकांच्यादृष्टीने अन्यायकारक व रोष पत्करल्यासारखे होणार आहे.
शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आकारण्यात आलेली देणगी आम्हास मान्य आहे. तशी देणगी देण्यास आम्ही तयार आहोत. पण विदयार्थ्यांकडून ५० रुपये न घेता प्रतिविद्यार्थी १० रुपये इतका निधी आकारण्यात येऊन सर्व विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा. अशी मागणी करण्यात आली.
शिक्षणाधिकारीसो (माध्य.) जि. प. कोल्हापूर यांनी शाळांचे माहे ऑक्टोंबर पेड नोव्हेंबर पगार पत्रके स्वीकारणार नसल्याचे शाळांना परिपत्रकाव्दारे कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संभ्रम व कांहीसा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सशस्त्र सेना ध्वजनिधी बाबत विद्यार्थी फेर आदेश शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना द्यावा अशी मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे शिक्षणाधिकारी यांना आदेश देण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मान्य केले.
या शिष्टमंडळात मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, रविंद्र मोरे, सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडीटर इरफान अन्सारी, संचालक श्रीकांत पाटील, सागरकुमार चुडाप्पा, एम. जी. पाटील, पोपट पाटील, बाजीराव साळवी आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.), वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





