नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *वाचन प्रेरणा दिनानिमित्त इचलकरंजीत १४ ऑक्टोबरला वीस माध्यमिक शाळांना ग्रंथदान – ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचेकडून चारशे दर्जेदार पुस्तके भेट* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*वाचन प्रेरणा दिनानिमित्त इचलकरंजीत १४ ऑक्टोबरला वीस माध्यमिक शाळांना ग्रंथदान – ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचेकडून चारशे दर्जेदार पुस्तके भेट*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*वाचन प्रेरणा दिनानिमित्त इचलकरंजीत १४ ऑक्टोबरला वीस माध्यमिक शाळांना ग्रंथदान – ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचेकडून चारशे दर्जेदार पुस्तके भेट*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, इचलकरंजी
इचलकरंजी येथील नामवंत शिक्षण संस्थांच्या वीस माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेजना “भारतरत्न, दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम” यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या “वाचन प्रेरणादिनाचे ” औचित्य साधून, ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार जीवन साळोखे हे चारशेहे पुस्तके भेट देणार आहेत.
आपल्या “वाचन प्रोत्साहनासाठी आणि समृद्ध शालेय ग्रंथालयासठी ग्रंथदान ” या उपक्रमांतर्गत ही पुस्तके ते जाहीर कार्यक्रमात भेट देणार आहेत.
इचलकरंजीमधील नॅशनल हायस्कूल, विनायक हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, नारायण मळा हायस्कूल, दि न्यू हायस्कूल, बालाजी हायस्कूल, रामभाऊ जगताप हायस्कूल, इंदुमती आवाडे हायस्कूल , तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल, अशोका हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल,भारती हायस्कूल, शहापूर हायस्कूल, मणेरे हायस्कूल, मथुरा हायस्कूल, उर्दू हायस्कूल, गंगामाई गर्ल्स हायस्कूल, आंतरभारती हायस्कूल या प्रशालांना जीवन साळोखे हे आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत ग्रंथभेट देणार आहेत.
इचलकरंजी शहर मुख्याध्यापक संघ आणि शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने या ग्रंथभेट कार्यक्रमाचे *न्यू इंग्लिश स्कूल, (इंडस्ट्रियल इस्टेट ) इचलकरंजीच्या सभागृहात शनिवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुस्तक संचासोबत ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन यांची प्रतिमा आणि ग्रंथदान उपक्रमास प्रेरणा देणारे स्मृतिचिन्ह प्रत्येक प्रशालेस प्राचार्य जीवन साळोखे यांचेकडून देण्यात येणार आहे.
सदरचा कार्यक्रम खंजिरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूणराव खंजिरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी प्रशासनाधिकारी अजयकुमार बिरणगे, जि. प. कोल्हापूरचे अधिक्षक प्रविण फाटक हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
इचलकरंजी येथे प्रथमच होणाऱ्या या ग्रंथदान कार्यक्रमास संबंधित शिक्षकांसह वाचनप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक इचलकरंजी शहर मुख्याध्यापक संघ व शैक्षणिक व्यासपीठ यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031