नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचे दुःखद निधन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचे दुःखद निधन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

माजी आमदार श्रीपतराव दिनकर शिंदे यांचे दुःखद निधन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गडहिंग्लज
सहा दशके गडहिंग्लज आणि कोल्हापूर जिल्ह्यात जनआंदोलनाचा चेहरा बनलेले आणि परिवर्तनवादी विचाराचे जननायक गडहिंग्लजचे माजी आमदार आणि आप्पासाहेब नलवडे सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन अँड.श्रीपतराव शिंदे यांनी आज पुणे येथील रूबी हाॅस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला.
असंख्य राजकिय वादळे उठली आणि शांत झाली पण माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी आयुष्यभर समाजवादी विचाराशी ठाम राहिले. गोर-गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, देवदासी आणि सर्वहारा समाज या जनतेचा आवाज बुलंद केला.
आमदार श्रीपतराव शिंदे यांचे पार्थिव रविवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी ७ वाजता गडहिंग्लज येथे आणण्यात येणार असून ९ वाजता नूल (ता.गडहिंग्लज) येथे मूळ गावी नेण्यात येणार असून सकाळी १०.३० वाजता भडगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728