नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके तसेच अप्रकाशित कविता पाठविण्याचे साहित्य मंचचे आवाहन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके तसेच अप्रकाशित कविता पाठविण्याचे साहित्य मंचचे आवाहन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके तसेच अप्रकाशित कविता पाठविण्याचे साहित्य मंचचे आवाहन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
अक्षरसागर साहित्य मंच, गारगोटी यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके तसेच अप्रकाशित कविता पाठविण्याचे
आवाहन साहित्य मंचचे अध्यक्ष डॉ.मा.ग.गुरव यांनी केले आहे.
अक्षरसागर साहित्य मंच एक दशकापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण, भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार यासह विविध प्रबोधनपर व्याख्याने, पुस्तक प्रकाशन, काव्यवाचन आदी उपक्रमातून नवोदितांना संधी देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आता अक्षरसागर मंच प्रकाशन क्षेत्रात पदार्पण करीत असून नजीकच्या काळात अक्षरयात्री हा दर्जेदार काव्यसंग्रह प्रकाशित करीत आहोत.
साहित्य पुरस्कारात कादंबरी, कथा, कविता, बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही) आणि संकिर्ण (इतर सर्व साहित्य प्रकार) या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे‌ पुरस्काराचे स्वरुप आहे.
लेखक, प्रकाशक यांनी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय १ जानेवारी २०२४ पर्यंत पाठवावेत.
तसेच नवोदित कविंनी आपल्या स्वरचित दोन अप्रकाशित कविता (८ ते २० ओळी) आयकार्ड साईज फोटोसह ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पाठवाव्यात. तसेच ‘अक्षरयात्री’ कवितासंग्रहासाठी गुगल पे अथवा फोन पे द्वारे नाममात्र शुल्क २०० रुपये 9850393996 या नंबरवर पाठवून स्क्रिन शॉट पाठवावा.
पुस्तके किंवा अप्रकाशित कविता
श्री.बा.स.जठार, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी ता. भुदरगड, जि.कोल्हापूर – ४१६२०९ मो. नं. 9850393996 किंवा 9420436256 यांच्याकडे पाठवाव्यात असे आवाहन अक्षरसागर साहित्य मंचचे अध्यक्ष डॉ.मा.ग.गुरव यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031