नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूर जिल्हास्तरिय शालेय स्केटिंग स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंचा सुवर्ण विजय – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कोल्हापूर जिल्हास्तरिय शालेय स्केटिंग स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंचा सुवर्ण विजय

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर जिल्हास्तरिय शालेय स्केटिंग स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंचा सुवर्ण विजय
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तसेच अमॅच्युअर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शालेय जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा कोल्हापूर व जयसिंगपूर या ठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धा रिंग व रोड रेस या प्रकारामध्ये घेण्यात आल्या. दोन्हीही प्रकारामध्ये ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लब, गारगोटीच्या स्केटिंग खेळाडूंनी ११, १४ व १७ वर्षाखालील गटामध्ये सुवर्णपदकांची कमाई केली असून त्यांची निवड कोल्हापूर विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी झाली आहे.
या स्पर्धेतील यशस्वी खेळाडू असे –
११ वर्षाखालील गटामध्ये कु. व्यंकटेश विनायक सुतार प्रथम क्रमांक, १४ वर्षाखालील गटात कु.धैर्यशील मारुती पारळे प्रथम क्रमांक तर १७ वर्षाखालील गटात कु. रणवीर सुनील भारमल याने प्रथम क्रमांक त्याचबरोबर कु. यश शशिकांत दबडे व कु. यज्ञेश विक्रम वडर यांनी यशस्वी कामगिरी केली.
या खेळाडूंना ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचे अध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक इंद्रजीत मराठे, सत्यजित मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. सुनील भारमल, मारुती पारळे, विनायक सुतार त्याचबरोबर सर्व पालकांचे प्रोत्साहन मिळाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728