मुख्याध्यापक महामंडळाच्या जळगाव येथे होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : राज्य उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांचे आवाहन
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मुख्याध्यापक महामंडळाच्या जळगाव येथे होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : राज्य उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांचे आवाहन 
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार १८ नोव्हेंबर व रविवार १९ नोव्हेंबर २०२३ रोजी जे.टी.महाजन इंजिनिअरींग कॉलेज, फैजपूर, ता.यावल जि.जळगांव येथे संपन्न होत असून या अधिवेशनास कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. व्ही.जी.पोवार यांनी केले आहे.
या अधिवेशनात राज्याचे मंत्रीगण, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, शासनाचे सचिव, शिक्षण विभागातील अनेक अधिकारी उपस्थित राहणार असून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
शनिवार १८ नोव्हेंबर २०२३ रोजी स.८ वा. अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर कौन्सिल व कार्यकारीणी सभा होईल. स.१०.३० वा. उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर तज्ज्ञ मुख्याध्यापक शोधनिबंध सादर करतील.
दु.४.३० वा. मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ होणार असून त्यानंतर नियामक मंडळ सभा होणार आहे. रात्री ८.१५ वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
रविवार १९ नोव्हेंबर रोजी स.८.३० वा. शोधनिबंध त्यानंतर व्याख्यान होणार असून १०.३० वा. राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. दु.१२ वा.खुले अधिवेशन व त्यानंतर अधिवेशनाचा समारोप होणार आहे.
या राज्यस्तरीय अधिवेशनाचे संयोजन जळगांव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, जळगांव यांच्याकडे असून या अधिवेशनास कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राज्य उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी केले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





