नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कु.चैताली अनिल धुरी हिने पटकावला कै.सौ.सावित्री केरु गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार : जुवाठी माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कु.चैताली अनिल धुरी हिने पटकावला कै.सौ.सावित्री केरु गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार : जुवाठी माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कु.चैताली अनिल धुरी हिने पटकावला कै.सौ.सावित्री केरु गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
जुवाठी माध्यमिक विद्यालय, जुवाठी (ता.राजापूर जि. रत्नागिरी) या शाळेतील कु.चैताली अनिल धुरी या विद्यार्थिनीने या वर्षीचा कै.सौ.सावित्री केरु गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार पटकावला.
जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. रोख रक्कम सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, व पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक बी.के.गोंडाळ यांच्या कल्पकतेतून वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे ६ वे वर्ष आहे. तसेच यावेळी प्रसन्न वाघरे, आदिती सूर्यवंशी, कोमल परब, सानिका शिर्के या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच ग्रंथप्रदर्शन करुन मुलांनी पुस्तकांचे वाचन केले. यावेळी शिक्षक रामदास सावंत, बी.के.गोंडाळ, राजेंद्र मयेकर, सुरेश गोसावी उपस्थित होते. बी.के.गोंडाळ यांनी आपली आई कै. सौ. सवित्री केरु गोंडाळ यांच्या स्मरणार्थ रु.५००० शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावे कायम स्वरूपी ठेव म्हणून दिली आहे. त्या रकमेच्या व्याजातून हा पुरस्कार दिला जातो. वर्षभरात शालेय ग्रंथालयातून पुस्तके घेऊन वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण करून, त्याची एक स्वतंत्र वही घालून नोंद केली जाते. अशी या पुरस्कारासाठी अट घालण्यात आली आहे. यावर्षी पुरस्काराच्या मूल्याकनासाठी आलेल्या वहीतून चैताली धुरी हिच्या वहीचे पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728