नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , टिक्केवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून साकारला ‘वनराई’ बंधारा : पिके वाचल्याने शेतकऱ्यांतून समाधान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

टिक्केवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून साकारला ‘वनराई’ बंधारा : पिके वाचल्याने शेतकऱ्यांतून समाधान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

टिक्केवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून साकारला ‘वनराई’ बंधारा : पिके वाचल्याने शेतकऱ्यांतून समाधान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कूर
शेतीच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या ‘पाणी आडवा आणि पाणी वापरा’ या योजनेला प्रतिसादात देत टिक्केवाडी (ता.भुदरगड) येथे ग्रामपंचायत व टिक्केवाडी हायस्कूल टिक्केवाडीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून ओढ्यावर वनराई बंधारा साकारला. त्यामुळे आसपासच्या शेतीत उभ्या असलेल्या भात पीक व इतर खरीप पिकांना पाण्याचा लाभ होवून पिके वाचली गेल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
गेली महिनाभर पावसाने पाठ फिरवली आणि त्यातच दहा-बारा दिवसापूर्वी परतीच्या पावसामुळे वातावरण पुर्णतः कोरडे पडले आहे.त्यामुळे भात शेतीबरोबरच भुईमूग, नाचणा ही खरीप पिके अडचणीत सापडली आहेत.पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. पण शासनाने जिथे पाऊस जास्त पडतो तिथे पाणी वाया जावू देण्याचे धोरण अवलंबिले आहे.त्यानुसार पिकांना वाचविण्यासाठी पाणी आडवून ते शेतीसाठी वापरण्याचे अहवान केले आहे.
त्यादृष्टीने टिक्केवाडी येथे ग्रामपंचायत व टिक्केवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसभर श्रमदान करुन ओढ्यावर वनराई बंधारा उभारला आहे. पंचवीस फुट लांब व तीन फुट रुंदी आणि पाच-सहा फुट उंची असलेल्या या बंधाऱ्यासाठी मातीने भरलेल्या दीडशे पोत्यांचा वापर करण्यात आला आहे.बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले असून त्याचा उपयोग आसपासच्या शेतीसाठी झाला आहे. या पाण्यामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
यासाठी सरपंच राजेंद्र पाटील, ग्रामसेवक नवनाथ आदमापूरे, ग्रा.प.सदस्य बाळासाहेब मिटके, शिवाजी रामाणे, आप्पासो देसाई, माधुरी देसाई, पांडुरंग गुरव, मुख्याध्यापक ए.जी.देसाई, एस.एम.पाटील, ई.पी.पाटील, डी.एन.गुरव, शिवाजी पाटील, सागर कांबळे, संतोष कुंभार, प्रकाश कोगनुळकर, प्रदीप पाटील, साताप्पा कांबळे, नामदेव पाटील, महादेव गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728