नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुख्याध्यापक संघाच्या प्रश्नपत्रिका युट्युब चॅनेलवर प्रसारित केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मुख्याध्यापक संघाच्या प्रश्नपत्रिका युट्युब चॅनेलवर प्रसारित केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मुख्याध्यापक संघाच्या प्रश्नपत्रिका युट्युब चॅनेलवर प्रसारित केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या प्रथम सत्र परीक्षेचे काही पेपर युट्युब चॅनेलवर प्रसारित करुन फसवणुक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्याध्यापक संघाचे सहसचिव अजित महिपती रणदिवे यांनी तक्रार दिली आहे.
श्री.अजित रणदिवे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने इ.५ वी ते १० वीच्या चाचण्या, सत्र १ व २ परिक्षांच्या प्रश्नपत्रिका निर्मीती व छपाईचे काम केले जाते. व परीक्षा सुरु होण्यापुर्वी २ दिवस अगोदर जिल्ह्यातील व काही अन्य जिल्ह्यातील शाळांना सदरच्या प्रश्नपत्रिका पुरविल्या जातात. जेणेकरुन प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे मुल्यमापन एका विशिष्ट पातळीवर व्हावे.
प्रश्नपत्रिका शाळांना वितरीत करण्यापुर्वी परिक्षेचे वेळापत्रक दिले जाते. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच परिक्षा घ्याव्यात अशा सक्त सुचना शाळांना दिल्या जातात. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी विषयनिहाय प्रश्नपत्रिकांची गोपनीयता दिली जाते. त्याचा भंग झालेस शाळांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाते.
प्रथम सत्र परीक्षेचे काही पेपर नॅचरल होमवर्क (Natural Homework) या युटयुब चॅनलवर कोणाला तरी प्रश्नपत्रिका पुरविण्याच्या हेतुने परस्पर प्रसारीत करुन कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
गुन्हा नोंद झाल्यामुळे घटनेच्या मुळापर्यंत जाऊन मुख्य आरोपी शोधण्यात यश येईल असा विश्वास संघाचे सहसचिव अजित रणदिवे यांनी व्यक्त केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728