नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या स्मृतीनिमित्य आकुर्डे येथे किर्तन सोहळा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या स्मृतीनिमित्य आकुर्डे येथे किर्तन सोहळा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या स्मृतीनिमित्य आकुर्डे येथे किर्तन सोहळा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
प.पू.ब्रह्मलीन ह.भ.प. वै.सद्गुरु बाबा महाराज सातारकर यांच्या स्मृतीनिमित्य आकुर्डे (ता.भुदरगड) येथील श्री जोतिबा मंदिरात किर्तन सोहळा संपन्न झाला. ह.भ.प. संदिप हातकर महाराज (महागोंडवाडी) ता.आजरा यांच्या सुश्राव्य वाणीतुन हे किर्तन झाले.
हभप बाबा महाराज सातारकर यांचा जीवन प्रवास व त्यांनी आध्यात्म आणि भजन व किर्तन क्षेत्रात केलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले कार्य श्री.हतकर महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने कथन केले. आध्यात्म आणि वारकरी संप्रदायातील अनेक दाखले, सिद्धांत आणि दृष्टांत देत संदिप हातकर महाराजांनी बाबा महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवला.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बाबा महाराजांनी मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भाषेमध्ये किर्तन आणि प्रवचने केली. आपल्या भागवत धर्माची पताका साता समुद्रापार पोहचवली. त्यांच्या या कार्याची दखल ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली हेच भागवत धर्माचे यश आहे.
आकुर्डे आणि पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्त, वारकरी व बाबा महाराजांचे शिष्यगण, अनुयायी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी बाबा महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728