श्री.शाहू कुमार भवन येथे गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी राजर्षी छ. शाहू महाराज पुतळा अनावरण समारंभ : १९९०-९१ सालच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस पुतळा भेट
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
श्री.शाहू कुमार भवन येथे गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी राजर्षी छ. शाहू महाराज पुतळा अनावरण समारंभ : १९९०-९१ सालच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस पुतळा भेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील श्री.मौनी विद्यापीठ संचलित श्री.शाहू कुमार भवन या बहुउद्देशीय प्रशालेतील सन १९९०-९१ यावर्षीच्या इ. १० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस भेट म्हणून देण्यात येत असलेल्या राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे समारंभपूर्वक अनावरण गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी स. १० वाजता रोजी होत असल्याची माहिती श्री.रवी देसाई व श्री.अमरदीप खोत यांनी दिली.
श्री. मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या प्रेरणेतून होत असलेल्या समारंभात सर्व माजी शिक्षकांच्या शुभहस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थान श्री. मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा) भूषविणार आहेत.
यावेळी कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. युवराज देवाळे यांच्या व्याख्यान होणार आहे. यावेळी श्री. मौनी विद्यापीठाच्या विश्वस्त सौ पल्लवीताई कोरगावकर, शासकीय प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, कर्मचारी प्रतिनिधी प्रा. डॉ. अरविंद चौगले, संचालक प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, श्री शाहू कुमार भवनच्या मुख्याध्यापिका सौ. पी. आर. सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्री.शाहू कुमार भवन येथे राजर्षी छ. शाहू महाराज पुतळा अनावरण समारंभानंतर
दु. १२.३० वाजता रावजी देसाई मंगल कार्यालय, फणसवाडी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा होणार आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





