शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : माजी कृषीमंत्री, खास.शरद पवार दीपावलीनिमित्त आ.आसगावकर यांनी खास.शरद पवार यांना दिल्या शुभेच्छा
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : माजी कृषीमंत्री, खास.शरद पवार
दीपावलीनिमित्त आ.आसगावकर यांनी खास.शरद पवार यांना दिल्या शुभेच्छा
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, बारामती
शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी अवघ्या तीन वर्षांतच मतदार संघातील साडेचार हजार शाळांना प्रिंटर, टिव्ही संच व पुस्तके देऊन शिक्षक आमदार कसा असावा हा आदर्श शिक्षण क्षेत्रात निर्माण केला ही बाब कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार देशाचे माजी कृषीमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांनी काढले.
दीपावली सणानिमित्त देशाचे माजी कृषीमंत्री, खासदार शरदचंद्र पवार यांची गोंविदबाग (बारामती) येथील त्यांच्या निवासस्थानी आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी खास.शरद पवार यांनी आमदार जयंत आसगावकर यांचेकडून मतदार संघातील केलेल्या कामाची माहिती व आढावा घेतला.
यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, जयंत आसगावकर यांनी शिक्षक आमदार कसा असावा हा आदर्श शिक्षण क्षेत्रात निर्माण केला, ही बाब कौतुकास्पद आहे, आपण विश्वास सार्थ ठरवला. आपले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवास्पद उद्गार काढले.
याप्रसंगी खासदार शरद पवार यांनी आम. आसगावकर यांच्याबरोबर शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. नवीन शैक्षणिक धोरण व समस्या याबाबत माहिती घेत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य गणपतराव तावरे, संदीप पाथरे, सुदेश जाधव, श्रीधर गोंधळी, शिवाजीराव लोंढे आदी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





