नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आबिटकर स्कुल आयोजित किल्ला स्पर्धेत शिवन्या घरपणकर, विराज मुगडे, स्वराज गोरे प्रथम : स्पर्धेत २७० स्पर्धकांचा सहभाग – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आबिटकर स्कुल आयोजित किल्ला स्पर्धेत शिवन्या घरपणकर, विराज मुगडे, स्वराज गोरे प्रथम : स्पर्धेत २७० स्पर्धकांचा सहभाग

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आबिटकर स्कुल आयोजित किल्ला स्पर्धेत शिवन्या घरपणकर, विराज मुगडे, स्वराज गोरे प्रथम : स्पर्धेत २७० स्पर्धकांचा सहभाग

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील युवा ग्रामीण विकास संस्था संचलित श्री.आनंदराव आबिटकर इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज गारगोटीच्या वतीने दिपावली निमित्त आयोजित केलेल्या किल्ला स्पर्धेत कु.शिवन्या घरपणकर, कु.विराज मुगडे, कु.स्वराज गोरे यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम पटकवला. गेल्या १५ वर्षापासून शाळेच्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी गारगोटी शहर व परिसरातील २७० स्पर्धकांनी किल्ला स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत चिमुकल्यांनी भुदरगड, रायगड, प्रतापगड, तोरणा यासांरख्या किल्यांच्या प्रतिकृती उभारल्या होत्या. या स्पर्धेचा गारगोटी शहर व गारगोटी परिसर असा स्वतंत्र निकाल असा –
गारगोटी शहरासाठी ३ ते ६ वयोगट : प्रथम क्रमांक – शिवन्या सोरटे, द्वितीय क्रमांक – समर्थ पाटील, तृतीय क्रमांक – शौर्य वास्कर, ७ ते १० वयोगट : प्रथम क्रमांक – विराज मुगडे, द्वितीय क्रमांक – श्रेयश वास्कर, तृतीय क्रमांक – सोहम शिंदे, ११ ते १५ वयोगट : प्रथम क्रमांक – आयुष कुपटे, द्वितीय क्रमांक – स्वराज देसाई, तृतीय क्रमांक – स्वराज शिंदे
गारगोटी परिसरासाठी ३ ते ६ वयोगट : प्रथम क्रमांक – शिवन्या घरपणकर, द्वितीय क्रमांक – शंभूराज मगदुम, ७ ते १० वयोगट : प्रथम क्रमांक – अंशुमन देसाई, द्वितीय क्रमांक – शशांक कासार, तृतीय क्रमांक – आर्यन कोळस्कर व स्वराज देसाई, ११ ते १५ वयोगट : प्रथम क्रमांक – स्वराज गोरे, द्वितीय क्रमांक – ऋग्वेद सुतार, तृतीय क्रमांक – रोषन गोरे
या स्पर्धेतील विजेत्यांना गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, कडगांव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर.वाय.देसाई, गारगोटी ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य प्रशांत भोई, संस्था प्रतिनिधी अवधुत परुळेकर, जितेंद्र भोसले, दाभिल ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रावण वाझे, निलेश वास्कर यांच्या उपस्थितीत प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य तुकाराम माने व आभार प्रा. निलेश कासार यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728