मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी शिक्षणतज्ञ व सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी शिक्षणतज्ञ व सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन 
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने मंगळवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सायं.७ वा. डायटचे निवृत्त प्राचार्य, लेखक, शिक्षणतज्ञ व सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिणचे खुर्द शिक्षण मंचचे अध्यक्ष प्राचार्य डी. एस. देसाई यांनी दिली.
मिणचे खुर्द शिक्षण मंच आयोजित ‘जागर विचारांचा’ अंतर्गत दुसऱ्या विचार पुष्प गुंफण्यासाठी डॉ.विलास पाटील यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.विलास पाटील यांचे मुळ गांव साके ता.कागल असून महाविद्यालयीन काळात त्यांनी वक्तृत्व, कथाकथन व काव्यवाचन स्पर्धात १०० पेक्षा अधिक विक्रमी पारितोषिके पटकावली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून घेण्यात आलेल्या प्राचार्य परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी १८ वर्ष डायट कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यांचा विविध संस्था व फौंडेशनकडून गौरव झाला असून अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. सध्या सारथी, पुणे या संस्थेवर कार्यकारी पदावर कार्यरत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





