नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड तालुका माध्य. उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ.वर्षा अरविंद देसाई यांची तर व्हा.चेअरमनपदी प्रकाश लक्ष्मण येजरे यांची निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगड तालुका माध्य. उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ.वर्षा अरविंद देसाई यांची तर व्हा.चेअरमनपदी प्रकाश लक्ष्मण येजरे यांची निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड तालुका माध्य. उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ.वर्षा अरविंद देसाई यांची तर व्हा.चेअरमनपदी प्रकाश लक्ष्मण येजरे यांची निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड तालुका माध्य. उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ.वर्षा अरविंद देसाई (कुमार भवन, शेणगाव) यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री.प्रकाश लक्ष्मण येजरे (लक्ष्मी विदयालय बेगवडे) यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.एस. व्ही. शिंदे होते.
यावेळी नूतन संचालक महेश जयसिंगराव पवार (कारमेलीन हायस्कूल, तांबाळे), सुभाष राजाराम कापसे (दिनकरराव जाधव हायस्कूल, वेसर्डे), बजरंग दिनकर कुरळे (न्यु.इंग्लिश स्कुल, पाल), वजीर गफुर मकानदार, (कडगाव हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, कडगाव), नामदेव नारायण शिंदे (गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, गारगोटी), श्री.दत्तात्रय महीपती कासारीकर (श्री. एस. डी. देसाई हायस्कूल, म्हसवे), श्री.प्रवीण आनंदा कोरवी (कूर हायस्कूल, कूर), हेमंत विलासराव देसाई (न्यु. इंग्लिश स्कुल, पाल), उदयसिंह श्रीपतराव देसाई, (कै.शामराव कासार हायस्कूल, मडूर), श्री.गंगाधर श्रीमंत माळी (श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल, गारगोटी), सौ.वनिता महादेव मोरुस्कर (श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल, गारगोटी) आदी संचालक उपस्थित होते.
या निवडीनंतर चेअरमन, व्हा.चेअरमन व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, प्रा.शहाजी वारके, माजी चेअरमन एम. एस. मोरुस्कर, संस्थेचे माजी व्हा.चेअरमन अभिजित पोवार, कोजीमाशीचे संचालक पांडुरंग हळदकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी कोजीमाशीचे माजी चेअरमन शांताराम तौदकर, तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष डी.एस.देसाई, संचालक बी.डी.सावंत, अरविंद देसाई, प्रा. सौ. मृणाल देसाई, सौ. निलम सोनार, श्रीमती यशोदा खोत, व्यवस्थापक सर्जेराव मोरे आदी उपस्थित होते. शेवटी आभार माजी चेअरमन मकरंद सोनार यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728