नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पाल्य हीच आपली खरी संपत्ती असून यापुढे संपत्ती ज्ञानात मोजली जाईल : डॉ. विलास पाटील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पाल्य हीच आपली खरी संपत्ती असून यापुढे संपत्ती ज्ञानात मोजली जाईल : डॉ. विलास पाटील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पाल्य हीच आपली खरी संपत्ती असून यापुढे संपत्ती ज्ञानात मोजली जाईल : डॉ. विलास पाटील

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
जमीन, गाडी, बंगला किंवा अन्य मौल्यवान वस्तू म्हणजे संपत्ती नव्हे तर यापुढे संपत्ती ज्ञानात मोजली जाईल. शिक्षणाचे महत्व ओळखून पालकांनी आपल्या पाल्यास घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. मनाची श्रीमंती चांगली ठेवण्यासाठी शिक्षण उपयोगी पडते. कारण शिक्षण मोठे होण्यासाठी नाही तर चांगल होण्यासाठी मदत करते, असे उदगार सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, प्रसिद्ध व्याख्याते डॉ. विलास पाटील यांनी काढले.
मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने आयोजित प्रबोधनपर व्याख्यानप्रसंगी पालक व ग्रामस्थांना प्रबोधन करताना डॉ. विलास पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती आर.व्ही.देसाई होते.
डॉ. विलास पाटील म्हणाले, शिक्षण ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. जीवन ही शर्यत नव्हे मॅरेथॉन आहे. आपली मुले हीच आपली खरी संपती असते त्यामुळे तिची योग्य गुंतवणूक करा तिचे योग्य संवर्धन करा,
यावेळी डॉ. पाटील यांनी सुखी जीवनाची खरी सूत्रे व तत्वे काय आहेत ? याची समर्पक उदाहरणे देऊन त्याची ओळखही आपल्या खास शैलीत उपस्थित ग्रामस्थांना पटवून दिली.
याप्रसंगी शिक्षण मंचच्या वतीने दीपावली सुट्टीत खास विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कौशल्य विकसन स्पर्धेचा निकाल जाहीर करुन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणही करण्यात आले. राजे प्रतिष्ठानने आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेत तर भेटकार्ड बनवणे स्पर्धेत कु.परिणिता देसाई हिने प्रथम क्रमांक पटकवला. सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गावच्या सरपंच जयश्री खेगडे, उपसरपंच मनिषा नलवडे, राधानगरीचे गटशिक्षणाधिकारी बी.एम.कासार, भुदरगडचे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, शिक्षण मंचचे अध्यक्ष डी.एस.देसाई, उपाध्यक्ष महावीर पाटील, एस.डी.देसाई, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, आर.वाय.देसाई, एस.के.कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी स्वागत प्रा. प्रकाश देसाई यांनी केले. सूत्रसंचालन संजयकुमार देसाई यांनी केले तर आभार सौ.आक्काताई नलवडे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728