नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संविधान साक्षरता निर्माण व्हावयाची असेल तर शालेय स्तरावरच संविधानाची ओळख व्हायला हवी : प्राचार्य डॉ.ए.डी.कुंभार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

संविधान साक्षरता निर्माण व्हावयाची असेल तर शालेय स्तरावरच संविधानाची ओळख व्हायला हवी : प्राचार्य डॉ.ए.डी.कुंभार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

संविधान साक्षरता निर्माण व्हावयाची असेल तर शालेय स्तरावरच संविधानाची ओळख व्हायला हवी : प्राचार्य डॉ.ए.डी.कुंभार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊनही संविधनाबद्दल म्हणावी तशी जागरुकता झाल्याचे दिसत नाही. संविधान साक्षरता निर्माण व्हावयाची असेल तर शालेय स्तरावरच संविधानाची ओळख व्हायला हवी, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.ए.डी.कुंभार यांनी केले.
श्री.शाहू वाचनालय, गारगोटी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) यांच्या वतीने आयोजित संविधान दिन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ.ए.डी.कुंभार बोलत होते. अध्यक्षस्थानी आर.पी.आय.चे राष्ट्रीय उपाध्यक्ष, दलितमित्र पी.एस.कांबळे होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. कुंभार म्हणाले, आज संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याने संविधान धोक्यात आहे. अशावेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संविधानाची जपणूक करण्याची गरज आहे.
यावेळी भुदरगड तालुका संघाचे चेअरमन प्रा.बाळ देसाई, भुदरगड पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, व्ही.जे.कदम, बिद्रीचे संचालक अशोकराव कांबळे, विठ्ठलराव कांबळे, माजी सभापती गोपाळराव कांबळे, एस.के.कांबळे, बोद्धाचार्य एन.के.कांबळे, के.टी.कांबळे, नामदेवराव कांबळे, निवास सडोलीकर, बाळासाहेब कांबळे, राजु कांबळे, साताप्पा निर्मळे यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौ.अलका बळवंत कांबळे यांच्या ‘भिमाई रमाई’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी करुन दिला.
प्रारंभी स्वागत तालुकाध्यक्ष बबनराव कांबळे यांनी, प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष आर.एस.कांबळे यांनी, संविधान प्रास्ताविकाचे वाचन अरूण कांबळे यांनी केले. आभार सुशिलकुमार प्रज्ञावंत यांनी तर सुत्रसंचालन मनोज कांबळे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31