नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , १ डिसेंबरपासून राज्यातील विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन : इंटरनेट सुविधा नसलेल्या गावात हजेरी भरताना येणार अडचणी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

१ डिसेंबरपासून राज्यातील विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन : इंटरनेट सुविधा नसलेल्या गावात हजेरी भरताना येणार अडचणी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

१ डिसेंबरपासून राज्यातील विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन : इंटरनेट सुविधा नसलेल्या गावात हजेरी भरताना येणार अडचणी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी १ डिसेंबरपासून रोज ऑनलाईन स्वरुपात नोंदविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील इ.१ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांची हजेरी आता ‘स्विफ्ट चॅट’ या अ‍ॅपद्वारे ऑनलाइन नोंदवण्याचे आदेश दिल्याने शिक्षकांना यापुढे मोबाईलवर विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे. ज्या गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही अशा शाळातील विद्यार्थ्यांची हजेरी भरताना अडचणी येणार आहेत.
राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी ‘अटेंडन्स बॉट’च्या वापराचे प्रशिक्षण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभाग, तालुका, केंद्रस्तरावरील शिक्षकांना देण्यात येणार असल्याचे निर्देश परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांची हजेरी नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत पर्यवेक्षकीय यंत्रणा नियमितपणे आढावा घेणार आहे. प्रशिक्षणात दिलेल्या सूचनेनुसार चॅटबॉटद्वारे इ.१ ली ते १० वीच्या वर्ग शिक्षकांना विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवावी लागणार आहे. हजेरी नोंदविताना शिक्षकांना आपल्या शाळेचा यु- डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आयडीचा वापर करावा लागणार आहे, तर शिक्षकांना शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा लागणार आहे. मोबाईल क्रमांक बदलल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करण्याची सूचना दिली आहे.
सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित
शाळेतील शालार्थ आयडी उपलब्ध असलेल्या शिक्षकांना चॅटबॉटवर विद्यार्थी हजेरी नोंदविता येणार आहे. सेवार्थ इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना चॅटबॉटवर विद्यार्थी हजेरी नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येणार आहे. चॅटबॉटवर दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांसाठी स. ७ ते दु.१२, अन्य शाळांसाठी स. १० ते सायं. ५ या कालावधीत हजेरी नोंद करता येणार आहे. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असल्यास त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरुन नोंदवावी, चॅटबॉटद्वारे उपस्थिती नोंदविताना शालेय क्रमांकासाठी अडचणी आल्यास इतर शिक्षकांचा शालेय क्रमांक वापरुन ऑनलाइन उपस्थिती नोंदवावी, विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना अडचणी येत असल्यास शालेय संकेतस्थळ, सरल संकेतस्थळ, यू-डायस या सर्व संकेत स्थळांतील माहिती अद्ययावत करावी. सर्व संकेतस्थळांवरील अडचणी दूर होतील, असे स्पष्ट केले आहे.

कोट :
शासनाचा विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन स्वरूपात नोंदविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु ग्रामीण, डोंगराळ भागातील अनेक गावात, शाळांत अद्याप इंटरनेट सुविधा नाही. अशा शाळांतील शिक्षकांना विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविताना अडचणी येणार आहेत. त्याचा विचार होण्याची आवश्यकता आहे.
– श्री.सुरेश पांडुरंग पाटील, अध्यक्ष, भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघ, गारगोटी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31