नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीमंत क्षात्रजगदगुरु विद्यालयास इनरव्हील क्लबकडून विज्ञान साहित्य भेट – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्रीमंत क्षात्रजगदगुरु विद्यालयास इनरव्हील क्लबकडून विज्ञान साहित्य भेट

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्रीमंत क्षात्रजगदगुरु विद्यालयास इनरव्हील क्लबकडून विज्ञान साहित्य भेट

    ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मठगांव
    मठगांव (ता भुदरगड) येथील श्रीमंत क्षात्र जगद्गुरु विद्यालयास इनरव्हील क्लब आँफ मिलेनियर, कोल्हापूर या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत विज्ञान साहित्य भेट देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमंत विद्यावहिनी बेनाडीकर (सरकार) होत्या.
    यावेळी प्रशालेच्या वतीने क्लबच्या सदस्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. काठी लाठी , एन.सी.सी. परेड, झांज पथक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शाळेच्या प्रयोगशाळा कक्षात मुलांच्या कडून वैज्ञानिक प्रयोगाची प्रात्यक्षिके करून घेतली. शाळेच्या इंटरअँक्टीव्ह बोर्डमार्फत अध्यापन कौशल्ये दाखविण्यात आली. शाळेच्या विविध उपक्रमांचे पाहुण्यांकडून कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे हा क्लब फक्त महिलांमार्फतच चालविला जातो.
    प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वाय.के.पाटील यांनी केले. श्री. पाटील यांनी संस्था व शाळेच्या कामकाजाची माहिती दिली.
    यावेळी क्लबच्या अध्यक्ष आरती रायगांधी, क्लबच्या संस्थापिका पल्लवी मुग, सेक्रेटरी मृणाल शिंदे, ट्रेझरर शरयू पाटील, स्वरूप बेनाडीकर (सरकार) (ई.सी.कमिटी), शिल्पा सावंत ( ई सी कमिटी), श्रुती देसाई, रमा शिंपुगडे, श्री.मौनी महाराज शिक्षण संस्थेचे संचालक शिवजीत बेनाडीकर (सरकार), प्रशालेचे शिक्षक सी.व्ही.देसाई, दत्ता मोरसे, ए.डी.कांबळे, सतिश सुर्यवंशी, विष्णू खोत, विजय भिऊंगडे, संतोष पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन आणि आभार एम.के.खोत यांनी मानले.

    Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

    Advertising Space


    मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

    आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728