नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उद्या (१० डिसेंबर) ६९ केंद्रांवर एन.एम.एम.एस. सराव चाचणीचे आयोजन : राज्यातील पहिलाच प्रयोग गुणवत्ता वाढीसाठी चाचणीचा निश्चित फायदा : शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

उद्या (१० डिसेंबर) ६९ केंद्रांवर एन.एम.एम.एस. सराव चाचणीचे आयोजन : राज्यातील पहिलाच प्रयोग गुणवत्ता वाढीसाठी चाचणीचा निश्चित फायदा : शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

उद्या (१० डिसेंबर) ६९ केंद्रांवर एन.एम.एम.एस. सराव चाचणीचे आयोजन : राज्यातील पहिलाच प्रयोग
गुणवत्ता वाढीसाठी चाचणीचा निश्चित फायदा : शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर आणि चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तात्यासाहेब मुसळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१० डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय एन.एम.एम.एस. सराव चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य परीक्षा ज्या केंद्रांवरती होणार आहे, त्याच केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षेला सामोरे जाण्याची पूर्व तयारी म्हणून ही परीक्षा आयोजित केलेली आहे.
माध्यमिक शिक्षण विभागामार्फत अशा प्रकारचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम राबवला असून जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ताधारक होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल, असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केले.
या परीक्षेचा पेपर क्र.१ सकाळी १०.३० ते १२, पेपर क्र.२- १.३० ते ३ या प्रमाणे असेल. या परीक्षेस जिल्ह्यातील एकूण २६ हजार ३२५ इतक्या विद्यार्थ्यांना लाभ होणार असून ६९ परीक्षा केंद्रावर ही चाचणी होणार आहे. या परीक्षेचे पेपर वितरण माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांच्या दालनामध्ये चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.कस्तुरे व श्री.तारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या परीक्षेचे पेपर प्रवीण आंबोळे (व्यंकटराव हायस्कूल, इचलकरंजी) निवास फराकटे (दुधसाखर विद्यानिकेतन, बिद्री) विजय सुतार (विद्यामंदिर, मादळे) ए.आर. पाटील यांनी तयार केले असून उर्दू माध्यमाचे पेपर परवेज जहांगीर, शबाना मोमीन (अँग्लो उर्दू हायस्कूल, कराड) करमळकर गुलस्वार (नॅशनल हायस्कूल, इचलकरंजी) इब्राहिम फैज अल्लामा (इकबाल हायस्कूल, कुरुंदवाड) यांनी तयार केले आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031