चौडेश्वरी हायस्कूल, हळदीचे मुख्याध्यापक श्री.जी.के.भोसले यांना गृहरक्षक दलाचा सुवर्ण पुरस्कार जाहीर : ६१ व्या गृहरक्षक दिनानिमित नागरी संरक्षण दल, दिल्ली यांच्यातर्फे पुरस्कार
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
चौडेश्वरी हायस्कूल, हळदीचे मुख्याध्यापक श्री.जी.के.भोसले यांना गृहरक्षक दलाचा सुवर्ण पुरस्कार जाहीर : ६१ व्या गृहरक्षक दिनानिमित नागरी संरक्षण दल, दिल्ली यांच्यातर्फे पुरस्कार
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
चौडेश्वरी हायस्कूल, हळदी (ता.कागल) चे मुख्याध्यापक व मुरगूड पथक होमगार्डचे समादेशक जी.के. तथा गजानन भोसले यांना ६१ व्या गृहरक्षक दिनानिमित गृहमंत्रालय भारत सरकारतर्फे ६१ वा गृहरक्षक नागरी संरक्षण दल डी.जी.नवी दिल्ली यांच्यातर्फे सुवर्णपदक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
त्यांना लवकरच सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना संरक्षण मंत्रालयाचा एन.सी.सी. चा दोनवेळा पुरस्कार मिळाला आहे. श्री. भोसले हे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे संचालक आहेत. तर एन.सी.सी. चे मेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा