नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान’ अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांना प्रदान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान’ अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांना प्रदान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान’ अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांना प्रदान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, रत्नागिरी
चिपळूण येथील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच यांच्यावतीने ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३’ हा पुरस्कार अक्षरमित्र बी. के.गोंडाळ यांना अँड .स्वाती कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाचा आदर्श घेऊन महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात विधवा माता – महिला प्रथा पद्धती विरोधात आवाज उठविण्यात आला. अनेक ग्रामपंचायतीने तसे ठरावही केले. राजापूर तालुक्यातील जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बी.के .गोंडाळ यांनी या अनिष्ट प्रथेविरोधात वैयक्तिक स्तरावर उपक्रम घेतले, प्रथम राजापूर तहसील कार्यालयात आपल्या पत्नीच्या संमतीने स्वतः च्या मृत्यूनंतर पत्नीचे कुंकू पुसले जाऊ नये, अंगावरील अलंकार उतरवू नये याबाबतचे प्रतिज्ञापत्र केले, आपल्या जुवाठी गावातील प्रतिनिधीक स्वरूपात पंधरा विधवा मातांना साडी चोळी देऊन, आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला.आपली आई कै. सावित्री केरु गोंडाळ हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ जुवाठी गावात विधवा मातासोबत हळदीकुंकू कार्यक्रम घडवून आणला आणि या दोन्ही कार्यक्रमासाठी कणकवली येथील जेष्ठ साहित्यिका ,सामाजिक कार्यकर्त्या सरिता पवार यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले होते. या कृतिशील उपक्रमाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
चिपळूण येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मातोश्री मंच चे मुख्यप्रवर्तक संजय कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले, दै. रत्नभूमी च्या संपादिका धनश्री पालांडे, अँड. स्वाती कदम, प्राथमिक शिक्षिका राजमुद्रा कदम, खेर्डी हायस्कूलचे शिक्षक संतोष हातणकर, राजापूरचे सामाजिक कार्यकर्ते उमेश शिवगण, कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मारुतीकाका जोयशी, सौ मालती गोंडाळ आदी उपस्थित होत्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728